anand banssode.jpeg 
सोलापूर

सोलापुरातून दरवर्षी 40 जण करतात हिमालय सर 

अरविंद मोटे

जागतिक माउंटन दिन विशेष 

सोलापूर : युनायटेड नेशन मार्फत 2003 पासून दरवर्षी 11 डिसेंबरला जागतिक माउंटन दिन साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसासाठी एक थीम दिली जाते. "लाईफ ऑन लॅंड' ही यंदाची थीम आहे. पृथ्वीवरील जीव जंतूचे संरक्षण व्हावे, यासाठी ही थीम निवडण्यात आलेली आहे. हा दिवस साजरा करण्यामागे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करणे हा हेतू असून प्रतिर्षी त्या अनुषंगाने थीम निवडली जाते. 
सोलापूरमधूनही जगभरातील विविध ठिकाणी गिर्यारोहणासाठी सहली निघतात. सोलापूरमधून प्रतिवर्षी पाचशे-सहाशे जण सह्याद्री पर्वतावर गिर्यारोहणाचा आनंद घेतात. तर 30 ते 40 जण हिमालय सर करण्यासाठी जातात. तसेच पाच ते सहा जण आंतराराष्ट्रीय मोहिमात सहभागी होतात, अशी माहिती 360 एक्‍सप्लोररचे एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी दिली. 

जागतिक माउंटन दिनाच्या पार्श्‍वभूमीवर एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, 360 एक्‍सप्लोरर या कंपनीरला भारत सरकारने स्टार्टअपचा दर्जा दिला आहे. गिर्यारोहण हे साहसी पर्यटन असून, या कंपनीच्या माध्यमातून सोलापूरमधूनही अनेक गिर्यारोहकांनी जगभरातील विविध मोहिमात सहभाग नोंदवला आहे. 

सोलापूरकरांना आहे पर्वताचे आकर्षण 
सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठेही मोठा पर्वत नसला तरी काही माळशिरस, सांगोला तालुक्‍यात सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. शंभू महदेवाच्या डोंगरासह या दोन्ही तालुक्‍याला किंचित पर्वत रांगा लाभल्या आहेत. याठिकाणी पाचेगावसह काही गावे निसर्ग सौदर्यंसंपन्न आहेत. बार्शी तालुक्‍यालाही बालाघाटच्या डोंगररांगाची किनार लाभली आहे. इतरत्र सर्व सपाट भूप्रदेश आहे. असे असले तरी सोलापूरकरांना पर्वताचे मोठे आकर्षण आहे. दरवर्षी निघणाऱ्या गिर्यारोहण मोहिमात मोठ्या प्रमाणात सोलापूरकर सहभागी होतात. यामध्ये महिला, पुरुष व लहान मुलांचाही सहभाग असतो. युवकांचा तर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभतो, अशी माहिती गिर्यारोहक संतोष धाकपाडे यांनी दिली. 

गिर्यारोहणासाठी जाताना घ्यावयाची काळजी 

  • आयोजक कंपनी गिर्यारोहणात तज्ज्ञ आहेत का, हे पाहा? 
  • कंपनीकडे विमा संरक्षणाचे कवच आहे का? 
  • प्रशिक्षित ट्रेकर्स व रेस्क्‍यु टीम आहे का ? 
  • ज्या ठिकाणी गिर्यारोहणासाठी जायचे आहे तेथील परवानगी घेतली आहे का? 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

SCROLL FOR NEXT