सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 434 नवे कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 434 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज एकूण दोन हजार 917 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 483 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 434 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज केवळ पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 23 हजाराच्या पुढे गेले असून आज आलेल्या अहवालानुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 104 एवढी झाली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळे 633 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोना झाल्यामुळे अद्यापही आठ हजार 257 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त होऊन 15 हजार 244 जण आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत. 

आज झाडी (ता. बार्शी येथील) 75 वर्षाचे पुरुष, पोफळज (ता. करमाळा) येथील 55 वर्षाची महिला, कानड गल्ली करमाळा येथील 36 वर्षाचे पुरुष, साठेनगर मोहोळ येथील 80 वर्षाचे पुरुष, भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 633 एवढी झाले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT