SOLAPUR Crime sakal
सोलापूर

निवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! ‘आरटीई’ प्रवेशपत्रासाठी ३०० रुपये घेताना क्लर्कला पकडले

‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) असे त्या महिला लिपिकाचे नाव असल्याची माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. प्रभावती अंबादास वईटला (कस्सा) असे त्या महिला लिपिकाचे नाव असल्याची माहिती लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी दिली. ५८ वर्षीय महिला लिपिकाने बक्षीस स्वरूपात ही रक्कम स्वीकारली होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची हकीकत अशी, सध्या बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. आरटीईअंतर्गत नंबर लागलेल्या मुलांचे प्रवेश सध्या सुरु असून तक्रारदाराच्या मुलाचा ‘आरटीई’तून नंबर लागला होता. त्याचे प्रवेशपत्र दिल्यानंतर बक्षीस म्हणून पाचशे रुपयांची मागणी केली होती. तेवढे पैसे नसल्याने त्या महिला लिपिकाने तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेतले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या महिलेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई स्वप्निल सणके, प्रफुल्ल जानराव, अतुल घाटगे, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी यांच्या पथकाने केली.

  • ठळक बाबी...
    - महापालिका शिक्षण मंडळातील ५८ वर्षीय महिला लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
    - ‘आरटीई’तून प्रवेश मिळालेल्या पालकाला प्रवेशपत्र दिल्यानंतर मागितले ५०० रुपये
    - तक्रारदाराकडून तीनशे रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले
    - लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडीक यांच्या पथकाची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Latest Marathi News Live Update : अशोक खरातला थोड्या वेळातच कोर्टात हजर करणार

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

SCROLL FOR NEXT