kiran lohar sakal
सोलापूर

तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे ५.८५ कोटींची अपसंपदा! किरण लोहारसह त्यांची पत्नी व मुलाविरूद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८मधील कलम १३ (१) (ई), १३ (२) सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) सहकलम १२ प्रमाणे बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलाविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८मधील कलम १३ (१) (ई), १३ (२) सहकलम भारतीय दंड संहिता कलम १०९ तसेच सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ चे कलम १३(१) (ब), १३(२) सहकलम १२ प्रमाणे बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार, त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अपसंपदा आढळली आहे. दरम्यान, लोहार यांनी परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. तत्पूर्वी, शालार्थ आयडी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहारांनी तक्रारदाराकडून लाच घेतली होती. त्यावेळी त्यांना कार्यालयातच रंगेहाथ पकडले होते.

नागरिकांना आवाहन....

दरम्यान, कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT