60 officer in Karkamb in Pandharpur taluka 
सोलापूर

या गावाचा दबदबा; गावातील तक्रार निवारणासाठी तब्बल 60 हून अधिक कर्मचारी 

सुर्यकांत बनकर

करकंब (सोलापूर) : करकंब (ता. पंढरपूर) येथील बदललेल्या प्रभागरचनेला विक्रमी हरकती आल्याने तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी तब्बल साठहून अधिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करत फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले. एवढेच नाही, तर त्यांच्यासह गटविकास अधिकारी, मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आदी 60हून अधिक अधिकारी आज (सोमवार) करकंबमध्ये घरोघर जाऊन फेरसर्वेक्षण करत होते. 
करकंब ग्रामपंचायतीची मुदत ऑक्‍टोबर 2020 मध्ये संपत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी लोकसंख्येनुसार फेर प्रभागरचना केली जाणार आहे. त्यानुसार ग्रामसेवक व तलाठी यांनी प्रभागरचना करून विशेष ग्रामसभेत मांडली होती. त्यावेळी ही प्रभागरचना बेकायदेशीर असल्याचे सांगत अनेक ग्रामस्थांनी आक्षेप नोंदवले होते. त्यावर तहसील कार्यालयाकडे रीतसर लेखी आक्षेप नोंदविण्यासाठी सात ते चौदा फेब्रुवारी हा कालावधी देण्यात आला होता. यावेळी करकंब ग्रामपंचायतीच्या फेर प्रभागरचनेवर विक्रमी 27 लेखी तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यावर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्यासमोर सुनावणीही झाली. त्यानंतर स्थळपाहणी व चर्चा करण्यासाठी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी शुक्रवारी (ता. 28) करकंबमध्ये विशेष सभा बोलावली होती. त्यामध्येही सर्वमान्य असा तोडगा निघालाच नाही. शेवटी तहसीलदार वाघमारे यांनी फेरसर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेत एकाच दिवशी साठहून अधिक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करत प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरवात केली आहे. आज प्रत्येक अधिकाऱ्याला 50 कुटुंबांचे होम टू होम सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तहसीलदार, मंडल अधिकारी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT