Smart City Solapaur.jpg 
सोलापूर

सोलापुरात मार्चअखेरपर्यंत 600 कोटींची कामे होणार पूर्ण : स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंकळे-पाटील यांचा विश्‍वास 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन, पथदिवे, श्री सिद्धरामेश्‍वर तलाव सुशोभिकरण, होम मैदान ट्रॅकिंग, लक्ष्मी मार्केट, इंदिरा गांधी स्टेडिअम या 600 कोटींचे काम गतिमान पध्दतीने सुरू असून, ती मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत नवीपेठ, डफरीन चौक, माणिक चौक, पंचकट्टा परिसरात कामे सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परंतु कामे करावीच लागणार आहेत. नागरिकांनी तांत्रिक बाबी समजून घेतल्या पाहिजे. स्मार्ट सिटीच्या पंचवार्षिक योजनेंतर्गत शहराला 2 हजार 300 कोटी मंजूर झाले. त्यातील साधारण 1,200 कोटी हे शहरातील दोन्ही उड्डाणपूल व एसटीपी प्रकल्पांसाठी नियोजित आहेत. उर्वरित 1,069 कोटींमध्ये 450 कोटी हे उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी प्रस्तावित आहे, तर 619 कोटी निधीमध्ये एबीडी एरियामध्ये अंतर्गत जलवाहिनी, ड्रेनेजलाईन, रस्ते, तलाव सुशोभिकरण, होम मैदान ट्रॅकिंग, लक्ष्मी मार्केट आणि संपूर्ण शहरात पथदिवे ही कामे करण्यात येणार आहेत. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष केत, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे उपस्थित होते. 

57 टक्‍के काम पूर्ण 
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली कामे गतिमान पध्दतीने मार्गी लावण्याकरिता कंत्राटदारांनी मध्यप्रदेशातून 200 महिला कामगारांना आणले आहे. एबीडी एरियातील 93 टक्के ड्रेनेजचे काम पूर्ण झाले. अंतर्गत जलवाहिनीचे 63 टक्के काम, तर रस्त्यांची 57 टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

Sim Card Rules : रिचार्ज न केल्यास सिमकार्ड किती दिवसांनी बंद होतं? नवा नियम आहे खूपच फायद्याचा

SCROLL FOR NEXT