6000 rickshaw grants of 1500 get help Solapur Sub-Regional Transport Office
6000 rickshaw grants of 1500 get help Solapur Sub-Regional Transport Office sakal
सोलापूर

सोलापूर : ६००० रिक्षाचालकांना मिळाली मदत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनामुळे दुसऱ्या लाटेत शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. त्यानंतर कोरोनाची तिसरी लाट ओसरली. जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी अनुदान मिळविण्यासाठी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. यामुळे शहर जिल्ह्यातून १० हजार ३२९ रिक्षाचालकांनी अर्ज दाखल केले. यातील सहा हजार रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रिक्षाचालकांचे लॉकडाऊनमुळे होणारे हाल लक्षात घेऊन राज़्य शासनाने सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार पुपयांचे अनुदान घेण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, तिसरी लाट ओसरली तरी अनेकांना याचा लाभ मिळाला नसल्याचेही रिक्षाचालकांनी सांगितले. जिल्ह्यातील १२ हजार ५०० रिक्षाचालकांची संख्या आहे. यातील १० हजार ३२९ जणांनी अनुदानासाठी ता. ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज केल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यापैकी ४१४२ जणांचे अर्ज फेटाळले आहेत.

यातील ६ हजार १८७ रिक्षाचालकांना थेट अनुदानाचे वाटप करण्यात आले असङयाचे आरटीओ कार्यलयातून सांगणयता आले. मात्र, अनेक रिक्षाचालकांच्या खात्यावर पैसे आले नाहीत. त्यामुळे निम्म्याहून अधिक रिक्षाचालकांनी सानुग्र अनुदानासाठी अर्ज करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

आकडे बोलतात

  • एकूण परवानाधारक रिक्षाचालक : १२ हजार ५००

  • आरटीओकडे प्राप्त झालेले अर्ज : १० हजार ३२९

  • अनुदान मिळालेले रिक्षाचालक : ६ हजार १८७

  • अर्ज बाद झालेले रिक्षाचालक : ४ हजार ४२४

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले. यासाठी शहर जिल्ह्यातून दहा हजार अर्ज प्राप्त झाले होते. मात्र काही अर्ज विविध कारणांसाठी बाद झाले असून परिपूर्ण असलेल्या अर्जदारांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

- विजय तिराणकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

कोविड काळामधील राज्य शासनाकडून रिक्षा चालकांना पंधराशे रुपये देण्यात आलेल्या अनुदानामध्ये सोलापूर मधील 50 टक्केच्या वर रिक्षाचालकांना अनुदान मिळालेच नाही. कागदपत्राचे पूर्तता न केल्यामुळे बहुतांश रिक्षाचालकांना अनुदान मिळालेच नाही.

- महिपती पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी रिक्षा संघटना, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT