veer dam Sakal
सोलापूर

Veer Dam : वीर धरणातून ६१ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग; नीरा नदीची पाणीपातळी धोकादायक रेषेकडे; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता ६१ हजार ४८८ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

माळीनगर/लवंग : नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत गुरुवारी (ता. २५) सायंकाळी सहा वाजता ६१ हजार ४८८ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. यामुळे नीरा नदीतील वाहणाऱ्या पाण्याची पातळी धोकादायक रेषेकडे चालू झाली आहे.

वाढता विसर्ग लक्षात घेऊन नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे. वाढत्या विसर्गाकडे लक्ष ठेऊन असलेल्या फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी दिला आहे.

कालपासून भाटघर, नीरा देवघर, गुंजवणीच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाचा जोर पाहून आज दुपारनंतर वीरमधून नीरा नदीत पाणी एक हजार क्युसेकनी सोडण्यास सुरवात करावी लागेल, असा अंदाज धरून प्रशासनाने बुधवारी तशी तयारी ठेवली होती.

परंतु प्रचंड पावसाचा जोर आणि धरणात वेगाने वाढणाऱ्या पाण्याची आवक पाहता सकाळी ११ वाजताच १३ हजार ९११ क्युसेकने नीरा नदीत पाणी सोडायला सुरवात करावी लागली. त्यानंतर दुपारी एक वाजता २३ हजार १८५ ने वाढ झाली.

लगेचच दीड वाजता ३२ हजार ४५९ क्युसेकने वाढ झाली. तर सव्वादोन वाजता ४१ हजार ७३३ आणि तीन वाजल्यापासून ५५ हजार ६४४ क्युसेक वेगाने नीरा नदीत पाणी सोडले जात आहे. वीर धरण ९८ टक्के भरले असून एव्हढे टक्के स्थिर ठेऊन जादा आलेले पाणी नीरा नदीत सोडले जात आहे.

५० हजार क्युसेक्स नंतर होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची वाढ ही धोकादायक रेषेकडे चालू होते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता या विसर्गात बदल करण्यात येणार आहे.

त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रातील पंप व इतर साहित्य, जनावरे तत्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

नीरा नदीकाठच्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नीरा उजवा कालवा, फलटण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

Samsung Galaxy च्या तीन नव्या सिरीज लाँच; 7 हजारपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, दमदार फीचर्स अन् जबरदस्त ऑफर्स..

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Video: 'तुझं हे जे सुरुये ते बंद कर' निक्कीने आरबाजला झापलं! म्हणाली...'बाहेर काय सुरुये हे तुला...'

SCROLL FOR NEXT