corona treatment.jpg 
सोलापूर

माळशिरस तालुक्यात सापडले 79 नवे कोरोनाबाधित रुग्ण

शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात आज मंगळवार ( ता.25) रोजी प्राप्त अहवालानूसार 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आजपर्यंत एकूण 1087 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. एका रूग्णाचा मृत्यू झाला असून तालूक्‍यात एकूण 20 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

माळशिरस तालूक्‍यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज प्राप्त अहवालानूसार अकलूज येथे 29 रूग्ण, वेळापूर येथे 7, यशवंतनगर व फोंडशिरस येथे प्रत्येकी 6 रूग्ण, संग्रामनगर येथे 5, माळीनगर येथे 4, डोंबाळवाडी व तांदूळवाडी येथे प्रत्येकी 3, बोरगाव, महाळूंग व पिलीव येथे प्रत्येकी 2, तर आनंदनगर, देशमुखवाडी, गिरझणी, कन्हेर, माळशिरस, माळखांबी, मारकडवाडी, शेंडेचींच, श्रीपुर, तिरवंडी येथे प्रत्येकी एक रूग्ण असे एकूण 79 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. एकूण रूग्णसंख्या 1087 वर गेली आहे. 

औषधोपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी एकूण 564 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 503 रूग्णांवर औषधोपचार चालू आहेत. तालूक्‍यात एका रूग्णाचा मृत्यू झाला असून आज अखेर 20 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  
 

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT