सोलापूर

सोलापूरच्या ग्रामीण भागात 93 नवे कोरोनाबाधित 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरीच्या खाली आली आहे. आज एकूण 93 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार एक हजार 613 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 93 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सात पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 29 हजार 127 एवढी झाली आहे तर 842 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्त झाल्याने तीन हजार 322 जण अद्यापही वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त झाल्यामुळे 24 हजार 963 जणांना घरी सोडले आहे. आज नाईकवाडे प्लॉट बार्शी येथील 65 वर्षाचे पुरुष, तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष, जाधववाडी (ता. माढा) येथील 70 वर्षाचे पुरुष, शेटे पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर येथील 35 वर्षाची महिला, शेळगाव आर (ता. बार्शी) येथील 65 वर्षाचे पुरुष, वाडीकुरोली (ता. पंढरपूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील 71 वर्षाचे पुरुष, खवासपूर (ता. सांगोला) येथील 24 वर्षाची महिला, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील 80 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT