corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 98 नवे कोरोनाबाधित, पाच जणांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 2 हजार 265 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 167 अहवाल निगेटिव्ह आले असून 98 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 164 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीचे 62 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या आता 36 हजार 529 झाली आहे. त्यातील 34 हजार 111 जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात सध्या 1 हजार 350 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आजपर्यंत ग्रामीण भागातील एक हजार 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माळशिरसमधील 47 वर्षिय पुरुष, करमाळा तालुक्‍यातील चिकलठाण येथील 62 वर्षिय पुरुष, सांगोला तालुक्‍यातील महुद येथील 70 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील इसबावी येथील 60 वर्षीय महिला, पंढरपूर तालुक्‍यातील वाखरी येथील 65 वर्षिय पुरुष यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT