पोलिस भरतीवेळी बनावटगिरी Sakal
सोलापूर

पोलिस भरतीवेळी बनावटगिरी! डुप्लिकेट टोप घातला अन्‌ झाला जेरबंद

पोलिस भरतीवेळी बनावटगिरी! केसांचा डुप्लिकेट टोप घातला अन्‌ झाला जेरबंद

तात्या लांडगे

उमेदवारांची शारीरिक (मैदानी) चाचणी सुरू झाली. त्यावेळी शेवते (ता. पंढरपूर) येथील या तरुणाची बनावटगिरी उघड झाली.

सोलापूर : शहर पोलिस आयुक्‍तालयातर्फे (Solapur City Police Commissionerate) 67 पोलिस शिपाई पदासाठी भरती (Recruitment) प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आठ हजार 800 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्या उमेदवारांची शुक्रवारी शारीरिक (मैदानी) चाचणी सुरू झाली. त्यावेळी शेवते (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील प्रभुराम प्रकाश गुरव (वय 31) या तरुणाची बनावटगिरी उघड झाली. त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. त्याने उंची वाढावी म्हणून केसांचा बनावट विग लावला होता. त्याला आज शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिस भरतीसाठी उमेदवाराची उंची किमान 165 सेंमी असावी, असा निकष आहे. शहर पोलिस आयुक्‍तालयातर्फे आयोजित पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी (ता. 29) उमेदवारांची उंची, छाती मोजण्याचा टप्पा पार पडला. त्याची जबाबदारी फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरठ यांच्याकडे होती. उंची मोजत असताना प्रभुराम गुरव याची उंची मोजली जात होती. त्याचे आजूबाजूचे केस कमी आणि मध्यभागीच उंच केस असल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बहिरठ यांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या केसात हात घातला. त्यावेळी त्याने घातलेला केसाचा विग उपसून निघाला. तत्पूर्वी, प्रभुराम गुरव या उमेदवाराची मूळ उंची 163.7 सेंमी होती. त्यामुळे त्याने ही तोतयागिरी केल्याची बाब उघड झाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हणमंत बादोले हे करीत आहेत.

टोप घालूनही उंची कमीच निघाली

शेवते (ता. पंढरपूर) येथील प्रभुराम गुरव याची मूळ उंची 163.7 सेंमी इतकी आहे. पोलिस भरतीसाठी 165 सेंमी हा उंचीचा निकष पूर्ण करण्यासाठी त्याने केसाचा बनावट विग घातला होता. त्याची ही तोतयागिरी उघड झाली. दरम्यान, त्या उमेदवाराची केसाच्या बनावट विगसह उंची मोजली, त्यावेळी त्याची उंची 164.5 सेंमीपर्यंतच निघाली. विग घालूनही तो उंचीचा निकष पूर्ण करू शकला नाही. शासनाची फसवणूक करून सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रभुराम गुरव हा जेरबंद झाला. पोलिस भरतीवेळी असे अनेक प्रकार यापूर्वीही उघड झाल्याने संबंधित वरिष्ठ अधिकारी उमेदवारांची कसून तपासणी करतात. त्यातून हा प्रकार उघड झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT