ध्वनी-वायूप्रदूषण पडेल महागात Sakal
सोलापूर

सावधान! ध्वनी-वायूप्रदूषण पडेल महागात; भरावा लागेल एक लाखाचा दंड

सावधान! ध्वनी-वायूप्रदूषण पडेल महागात; भरावा लागेल एक लाखाचा दंड

तात्या लांडगे

दोनपेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाखाचा दंड आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन मालमत्ता सील होईल.

सोलापूर : दिवाळीच्या (Diwali) काळात रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके (Firecrackers) वाजविता येणार आहेत. तेही कमी आवाजाचेच असावेत, असे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर (Deputy Commissioner of Police Dr. Vaishali Kadukar) यांनी काढले आहेत. तर गुरुपर्वच्या निमित्ताने त्या दिवशी पहाटे चार ते पाच या वेळेत आणि नववर्ष (New Year), ख्रिसमसच्या (Christmas) दिवशी 31 डिसेंबरला रात्री 11.55 ते साडेबारापर्यंत फटाके वाजविण्यास परवानगी राहील, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियमन कायदा 1981 आणि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे उल्लंघन प्रकरणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भरपाई निश्‍चित केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने त्याला मान्यता दिली असून त्याची आता प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र ध्वनी प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिवाळीच्या निमित्ताने पोलिस प्रशासनास कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी नियोजन केले आहे. बंदी घातलेले फटाके उडविणाऱ्यांसह वेळेचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी पथकांची नियुक्‍ती केली आहे. दिवाळीचा उत्सव उत्साहात साजरा करावा, कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा पोलिस आयुक्‍त डॉ. कडूकर यांनी दिला आहे.

वेळेचे उल्लंघन केल्यास दंडाची तरतूद...

  • निवासी, व्यावसायिक ठिकाणी फटाके उडविल्यास एक हजारांचा तर शांततेच्या ठिकाणी फटाके उडविल्यास तीन हजारांचा दंड

  • सभागृह, मंगल कार्यालय, लॉन्स, खुले मैदानाच्या ठिकाणी फटाके वाजवल्यास पहिल्यांदा 20 हजारांचा तर दुसऱ्यांदा 40 हजारांचा दंड

  • मिरवणुकीत फटाके वाजविल्यास 10 ते 20 हजारांचा दंड; आयोजकाला भरावी लागणार दंडाची रक्‍कम

  • दोनपेक्षा अधिक वेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाखाचा दंड आणि पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन मालमत्ता सील होईल

21 लाखांचे फटाके जप्त

दिवाळीच्या काळात ध्वनी व हवा प्रदूषण होणार नाही, बंदी असलेल्या फटाक्‍यांची विक्री होणार नाही, यादृष्टीने दुकानांची पडताळणी करण्यासाठी शहर पोलिसांनी 30 पथके तयार केली आहेत. सोमवारी (ता. 1) पोलिसांनी संपूर्ण शहरातील फटाके विक्री दुकानांची पडताळणी केली. त्याअंतर्गत 23 गुन्हे दाखल केले असून 132 संशयित आरोपींकडून 21 लाख 34 हजार 655 रुपयांचे बंदी घातलेले फटाके जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT