सोलापूर

बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने उडाली खळबळ; इंचगावात भीतीचं वातावरण

अशपाक बागवान

नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने केले आहे.

बेगमपूर (सोलापूर) : बेगमपूरपासून दोन किमी अंतरावर इंचगाव (ता.मोहोळ) दरम्यान गुरुवारी सायंकाळी ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने नागरिक व शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित विभागाला याबाबत कळविले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने केले आहे. (a leopard like animal was spotted in a sugarcane field in Inchgaon on thursday evening)

दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी, बेगमपूरपासून दोन किमी अंतरावर इंचगावकडे जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या ऊसाच्या शेतात राहील सुतार या युवकाला सायंकाळच्या सुमारास जवळच्या ऊसाच्या शेतात बिबट्या सदृश प्राणी दिसून आला. त्याने तात्काळ आपल्या आई व वडिलांना याबाबत माहिती दिली. संबंधीत कुटूंबियांना ही सदर प्राणी ऊस शेताच्या बांधावर दिसून आला असल्याचे सांगितले. आम्ही अनेक वर्षांपासून शेतातच राहतो परंतु सदरचा बिबट्या प्रमाणेच दिसणारा प्राणी पहिल्यांदाच पाहिला असल्याचे सलीम सुतार यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गावातील अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकाश भालेराव या युवकाने वन विभाग व कामती पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान वन विभागाचे तालुका परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता वन विभागाचे पथक घटनास्थळावरील ठसे किंवा अन्य तत्सम बाबींची पाहणी करून बिबटया की अन्य प्राणी याबाबत खात्री करणार असल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून 'सकाळ'शी बोलताना दिली. दरम्यान नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी रात्री बाहेर न पडता दक्षता घ्यावी, असे आवाहन साळुंखे यांनी केले आहे.

मोहोळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून बिबट्या असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकरी बांधवांनी रात्री अपरात्री बाहेत फिरू नये, पोलिस ठाण्याकडून या भागात रात्रीची गस्त ठेवली असून, घाबरून जावू नये, असे आवाहन कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी केले आहे. दरम्यान या घटनेची माहिती परिसरात पसरली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (a leopard like animal was spotted in a sugarcane field in Inchgaon on thursday evening)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Maharashtra politics: मूळ मुख्यमंत्री अमित शहा! देवेंद्र फडणवीस शॅडो CM, शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर सवाल

Shraddha Bhosale : कुटुंब मूळचे गुजरातचे, जन्म मुंबईत, शिक्षण अमेरिकेत अन् सासर कोकणात; कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले? भाजपनं दिलीय उमेदवारी

‘कसाब बिर्याणी मागतोय’ हा ‘माझाच फंडा’! खासदार ॲड. उज्ज्वल निकम; प्रकट मुलाखतीत उलगडले अनेक किस्से..

Latest Marathi News Update LIVE : बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशराज! पाटण्यात ऐतिहासिक शपथविधी सोहळा

SCROLL FOR NEXT