सोलापूर

सावधान! करमाळ्यात बिबट्यासदृश प्राण्याचा वावर; वासरावर हल्ला

शेटफळ येथे हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाऴ वृत्तसेवा

शेटफळ येथे हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिखलठाण (सोलापूर): करमाळा तालुक्यातील शेटफळ येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने एका वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन वननिरीक्षक एस. आर. कुर्ले यांनी केले आहे. तालुक्यातील दिवेगव्हाण, सोगाव नंतर शेटफळ येथे हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील आनंद रामदास पोळ यांनी काल शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे आपली जनावरे शेतातील वस्तीवर बांधली होती. सकाळी गायीची धार काढायला गेल्यावर गायीचे वासरू बांधलेल्या ठिकाणीच त्याचे नरड्याचा भाग खाल्ल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. शनिवारी रात्री शेटफळ येथील आनंद रामदास पोळ यांच्या शेतातील वस्तीवरील गायीच्या वासरावर हल्ला करून ते फस्त केल्याने पुन्हा या भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने वासरू मारल्याचे खबर करतात. वनविभागाने या ठिकाणी धाव घेऊन परिसराची पाहणी करून पंचनामा केला.

घटनास्थळी असलेले ठशाचे फोटो घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. करमाळा तालुक्यात बिबट्या प्राण्याचा वावर असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले असले तरी या प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी याच दिवसात या परिसरात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी कामगारांच्या मुलीला प्राण गमवावे लागले होते. तेव्हापासून या परिसरात बिबट्याची दहशत होती. सध्या या परिसरातील शेतातील कामावर या घटनेचा परिणाम होत असून कारखान्याच्या ऊस तोडणीवरही याचा परिणाम होऊ लागला आहे.

शेटफळ येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने एका वासरावर ह्ल्ला केल्याची घटना घडली. त्या ठिकाणी प्राण्यांचे ठसे आहेत, याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांने घटनास्थळी येऊन हल्ला केलेला प्राणी नेमका कोणता याची माहिती देणे अपेक्षित असताना केवळ कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा केला. वनविभागाने ही घटना गांभीर्याने घेण्याची व सदर बाबतीत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

- विकास गुंड, सरपंच, शेटफळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT