Crime Sakal
सोलापूर

अनैतिक संबंधावरून जुजारपूर येथे विवाहितेचा खून!

अनैतिक संबंधावरून जुजारपूर येथे विवाहितेचा खून! तिचा फोन घेऊन मारेकरी फरार

श्रीनिवास दुध्याल, उमेश महाजन

नवरा परगावी गेलेला असताना 28 वर्षीय विवाहितेच्या मानेला गंभीर इजा करून तिचा खून करण्यात आला आहे.

महूद (सोलापूर) : नवरा परगावी गेलेला असताना 28 वर्षीय विवाहितेच्या मानेला गंभीर इजा करून तिचा खून (Crime) करण्यात आला आहे. शिवाय हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून संबंधित विवाहितेचा मोबाईल घेऊन मारेकरी फरार झाला आहे. ही घटना सांगोला (Sangola) तालुक्‍यातील जुजारपूर येथे शुक्रवारी (ता. 22) पहाटे पाच वाजण्याच्या पूर्वी घडलेली आहे. अनैतिक संबंधावरून विवाहितेचा खून करण्यात आल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणी खून झालेल्या विवाहितेचा चुलत दीर दादासाहेब दगडू पाटील यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. खून केलेल्या आरोपीने कोणाला काही कळू नये म्हणून तिचा मोबाईल नेला असल्याचा प्रकारही यात समोर आला आहे. खून झालेल्या रूपाली नारायण पाटील (वय 28) हिचा पती कंटेनरवर चालक आहे. त्यास काही दिवसांपूर्वी तिच्या मोबाईलमध्ये असलेल्या मेसेजवरून पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. त्यावरून त्या दोघांमध्ये वादही झाला होता. पत्नी रूपालीचा पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून तिच्या मानेला इजा करून तिचा खून करून जाताना आरोपीने तिचा मोबाईलही नेला आहे.

मृत रूपाली पाटील हिचा चुलत दीर दादासाहेब दगडू पाटील व पत्नी सुरेखा हे शुक्रवारी शेतात पिकाला पाणी देऊन पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येत असताना नारायणची दोन मुले घराबाहेर रडत बसली होती. मुले का रडतात म्हणून पाहिले तेव्हा रूपाली स्वयंपाक घरात फरशीवर निपचित पडली होती. आवाज देऊनही तिने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. पोलिस निरीक्षक सुहास जगताप हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT