सोलापुरात आढळला अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग ! जाणून घ्या या सापाचे वैशिष्ट्य  Canva
सोलापूर

अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग ! जाणून घ्या या सापाचे वैशिष्ट्य

सोलापुरात आढळला अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग ! जाणून घ्या या सापाचे वैशिष्ट्य

प्रकाश सनपूरकर

शहरातील डीआरएम कार्यालयाजवळ अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग आढळून आला.

सोलापूर : शहरातील डीआरएम कार्यालयाजवळ अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग (Rare Snake) आढळून आला. आनुवंशिक बदलामुळे (Genetic mutation) या प्रकारचा साप फार कमी वेळा पाहण्यास मिळतो. प्रत्येक सापाच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे खवले असतात. सर्व सापांच्या शरीरावर शुष्क व खरबरीत खवल्यांचे आवरण असते. हे खवले केराटिनापासून तयार झालेले असतात. साप स्वतःची त्वचा नियमित बदलत असतो, यास कात टाकणे असे म्हणतात. कात टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात व त्यास डोळ्याने दिसत नाही. वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये त्वचा तयार होते. कात टाकण्याची क्रिया विशिष्ट काळानंतर पुनःपुन्हा होत असते. साप वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा कात टाकत असतात.

मंगळवारी (ता. 24) सायंकाळी डीआरएम रेल्वे ऑफिस समोरच्या गेटमध्ये एक साप तेथील कर्मचारी संदीप पैकेकरी यांना दिसला. त्यांनी सापाला पकडण्यासाठी एक पाण्याची रिकामी बाटली घेतली. बाटलीचा वापर करून त्यात सुरक्षितपणे सापाला बंदिस्त केले. परंतु त्या सापाची ओळख पटत नव्हती, कारण तो साप वेगळाच दिसत होता. तेव्हा त्यांनी त्याचे फोटो डब्ल्यूसीएएसचे सदस्य रोहन तोडकरी आणि संतोष धाकपाडे यांना पाठविले. पैकेकरी यांनी तो पकडलेला साप सुरेश क्षीरसागर आणि सोमानंद डोके यांच्याकडे सुपूर्द केला. वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरच्या सदस्यांनी त्या सापाचे नीट निरीक्षण करून पाहिलं असता तो साप नाग प्रजातीचा असल्याचे समजले.

या सापाचे फोटो सर्प अभ्यासक वरद गिरी यांना पाठविले व सापाबद्दल माहिती घेतली. काही ठराविक सापांच्या शरीरावर खवलेच तयार होत नसतात. अशा सापांच्या अंगावर त्वचा असते परंतु खवले नसतात. जेनेटिक डिसऑर्डरमुळे (आनुवंशिक बदल) अशा घटना शंभरातून एखाद्या सापामध्ये घडतात, असे वरद गिरी यांनी सांगितले. ही माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांना देऊन त्या सापाची नोंद वन विभागाकडे करून त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वेळी वनरक्षक विशेष सेवा श्रीशैल पाटील, अजित चौहान, संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, सोमानंद डोके, मयांक चव्हाण, रोहन तोडकरी, संदीप पैकेकरी, निरंजन मोरे आदींनी बचाव कार्यात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या तारखांची घोषणा करत, ‘ECI’ने मतदारांनाही केल्या १० महत्त्वाच्या सूचना!

India Cricket Team: अजित आगरकर, गौतम गंभीरचा 'सिक्रेट प्लान'! रोहित शर्मा, विराट कोहली लवकरच होणार माजी खेळाडू

Crime: पैसे परत कर नाहीतर...; प्रेयसीची धमकी, ५० वर्षीय प्रियकर संतापला, रागाच्या भरात २ मुलांसह महिलेसोबत धक्कादायक कृत्य

सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

IND vs PAK : भारताच्या 'पोरींना' दिला त्रास, ICC ने उतरवला माज! पाकिस्तानच्या खेळाडूवर कारवाई

SCROLL FOR NEXT