दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीवर काळाचा घाला! Sakal
सोलापूर

दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीवर काळाचा घाला!

दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या चिमुकलीवर काळाचा घाला!

चेतन जाधव

अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबावर दिवाळी पाडव्याच्या सणादिवशी काळाने घाला घातला.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील (Akkalkot) वागदरी येथील श्रेया विठ्ठल चलगेरी (वय 6) या चिमुरडीला भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने गाडीने पाठीमागून धडक (Accident) दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना वागदरी- अक्कलकोट रोडवरील नागनाथ मंदिरासमोर शुक्रवारी (ता. 5) दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. या अपघाताची उत्तर पोलिस (Police) ठाण्यात नोंद झाली आहे. या अपघाताची फिर्याद प्रकाश सिद्धाराम पोमाजी (वय 33, रा. वागदरी, ता. अक्कलकोट) यांनी दिली. संशयित आरोपी जीपचालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले (रा. देगाव, ता. आळंद, जिल्हा गुलबर्गा) याच्यावर उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ धानलिंग मल्लिनाथ पोमाजी व भाची श्रेया विठ्ठल चलगेरी हे मामा-भाची आपल्या शेतवस्तीवर रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात होते. तेव्हा आळंदहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या जीपने (क्र. केए 09- बी 0022) पायी चालत जाणाऱ्या सहा वर्षीय श्रेयास पाठीमागून जोरात धडक दिल्याने ती जमिनीवर कोसळली. डोक्‍याला जबर मार लागून ती गंभीर जखमी झाली. श्रेयास रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासले असता उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. जीपचालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, चालक व वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.

फिर्यादीचे नातेवाईक व मृत श्रेयाचे वडील विठ्ठल कल्लाप्पा चलगेरी यांची शेतवस्ती फिर्यादीच्या हॉटेल सिद्धगंगा लगतच आहे. त्यांना आठवर्षीय दीक्षा व सहावर्षीय श्रेया अशा दोन मुली आहेत. त्यापैकी आजच्या अपघातात सहावर्षीय श्रेयाचा मृत्यू झाला असून, तिचे मूळगाव संगोळगी (ता. अक्कलकोट) हे आहे. ती मामाकडे दिवाळी सणानिमित्त वागदरीला आली होती. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या कुटुंबावर दिवाळी पाडव्याच्या सणादिवशी काळाने घाला घातला. यामुळे दोन्ही गावांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT