sakal
सोलापूर

बार्शीत तरुणींचा अनोखा उपक्रम; जोपासलेली वृक्ष दिली सर्वसामान्यांना

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक जणांचे बळी गेले ही घटना खूपच मनाला लागून राहिली वृक्षसंवर्धन केले तर ऑक्सिजन मोफत मिळतो

प्रशांत काळे

बार्शी : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक जणांचे बळी गेले ही घटना खूपच मनाला लागून राहिली वृक्षसंवर्धन केले तर ऑक्सिजन मोफत मिळतो अन् आरोग्याची प्रकृती उत्तम राहते या भावनेतून बार्शीच्या तरुणींनी जोपासलेली सुमारे अडीचशे वृक्ष गणेशमूर्ती खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींना देऊन एक आगळावेगळा उपक्रम राबवला असून त्यांचे शहरात कौतुक होत आहे.

शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या कालावधीत आम्हाला जोपासा,आम्ही तुम्हाला जोपासू या संकल्पनेतून सुमारे अडीचशे वृक्षांचे संवर्धन केले होते जोपासलेली वृक्ष नागरिकांना मोफत वाटप करण्याचा संकल्प केला होता. 21 मे रोजी सोबतच्या सहकारी मैत्रीण पुजा वाघमारे, क्रांती शिंदे, नवनाथ सुर्वे यांच्या मदतीने मागील दोन महिने आंबा, सिताफळ, तुळस, पिंपळ, जासवंद, पेरु, कडिपत्ता, चिक्कू यांसह विविध वृक्षांचे उत्तमरित्या लागवड करुन संगोपन केले होते.

गणेश चतुर्थी उत्सवाचे औचित्य साधून 50 वृक्ष संवर्धन समिती, जाणीव फाऊंडेशन दोन संस्थांना तर उर्वरीत 200 वृक्ष भगवंत मैदान येथे श्री गणेशमुर्ती विक्री स्टॉल येथे सामाजिक संघटना, मान्यवर व्यक्तींसह श्री गणेशमुर्ती घेऊन जाणाऱ्या नागरिकांना मोफत वाटप करण्यात आली.

यावेळी प्रसन्नदाता गणेश मंडळाचे बंडू माने, हर्षल रसाळ, पत्रकार गणेश घोलप, पाणीपुरवठा सभापती भैय्या बारंगुळे, चित्रकार महेश मस्के, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, उद्योजक नागेश सुरवसे, सतिश राऊत, प्रदिप हागरे, उमेश देशमाने, धनाजी मोरे, हेमंत शाहीर आदी उपस्थित होते.

या राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे अनेक नागरिकांनी कौतुक केले असून वृक्षांचे उत्तमरित्या संर्वधन करणार असल्याचे अभिवचन दिले. निसर्गातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, वृक्षांपासून पासून मिळणारा नैसर्गीक ऑक्सिजन सर्वांना मोफत मिळावा म्हणून हा उयक्रम राबविल्याचे जठार हिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Protest USA : इराण युद्धावरून अमेरिकेत संताप; ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात ९० लाख लोक रस्त्यावर उतरले

IPL 2026:'मला मजा आली...' इशान किशन RCB विरूद्धच्या पराभवानंतर काय बालून गेला? विराट कोहलीबद्दलही म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कल्याण रेल्वे स्थानकात मारहाण; दिव्यांग प्रवाशालाही बसला फटका, VIDEO व्हायरल

RCB vs SRH: विराटची भर मैदानात ईशान किशनसोबत थट्टा, हनवटीला धरून गोंजारलं; Video Viral

डोळ्यांसमोर मुलगा तडफडत होता… लॉक झालेल्या कारमध्ये ३ वर्षांचा चिराग जिवंत जळाला; लग्नाच्या ८ वर्षांनी झालेला मुलगा काळाने हिरावला

SCROLL FOR NEXT