लपवला जातोय कारभार! कासेगाव ग्रामपंचायतविरोधात महिला सदस्याची तक्रार Canva
सोलापूर

लपवला जातोय कारभार! कासेगाव ग्रामपंचायतविरोधात महिला सदस्याची तक्रार

लपवला जातोय कारभार! कासेगाव ग्रामपंचायतविरोधात महिला सदस्याची तक्रार

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

विरोधी पार्टीच्या सदस्यांना विश्वासात न घेता कासेगाव ग्रामपंचायतीचा कारभार सुरू असल्याची तक्रार येथील महिला सदस्याने केली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : विरोधी पार्टीच्या सदस्यांना विश्वासात न घेता कासेगाव ग्रामपंचायतीचा (Kasegaon Gram Panchayat) कारभार सुरू असल्याची तक्रार येथील महिला सदस्याने केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सत्ताधारी पार्टीच्या सदस्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. ग्रामपंचायत सदस्या सविता मारुती काळे (Savita Kale) यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे कासेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या, कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये अजब कारभार घडत असल्याचा प्रकार येथील महिला सदस्या सविता मारुती काळे यांनी उजेडात आणला आहे. विरोधी सदस्यांना विश्वासात न घेता कारभार होत असल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकाराने पंढरपूर तालुक्‍याच्या प्रशासन वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या सात महिन्यांपूर्वी या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने 17 पैकी 15 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. याच पार्टीची सत्ता या ग्रामपंचायतीवर आहे. याचवेळी विरोधी अवताडे गटाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. यामध्ये सविता मारुती काळे तसेच सुमन पांडुरंग लिंगे यांचा समावेश आहे. येथील वॉर्ड क्रमांक 4 मधून सविता काळे या सदस्य निवडून आल्या होत्या. याच महिला सदस्याने ग्रामपंचायत कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून चार मासिक बैठका पार पडल्या, या बैठकांमधील विषय तसेच मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही विषयांची माहिती अद्यापपर्यंत आपणास देण्यात आली नाही. याच वेळी बैठकांना उपस्थित राहण्यासंदर्भात कळविण्यात आलेले नाही, एवढेच काय तर संबंधित विषयांची माहिती मागूनही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दिली जात नसल्याची तक्रार सविता काळे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये ग्रामसेवक येलपले यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचाही खुलासा काळे यांनी केला आहे .

लोकशाहीमध्ये विरोधी गटास अनन्यसाधारण महत्त्व आहे. विरोधी गटाच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांचे राजकारण अवलंबून असते. याचवेळी विरोधकांना विश्‍वासात घेत काम केल्यास अशक्‍य ते काम होऊ शकते. या गोष्टी सर्वमान्य आहेत. असे असताना कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये एका महिला सदस्याची होत असलेली कुचंबणा आणि ग्रामसेवकाकडून होत असलेली मानहानीबद्दल काय समज देणार, याकडे तालुक्‍यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT