cash

 
sakal
सोलापूर

सोलापूर शहरातील ‘या’ शाळेत नोकरी लावतो म्हणून तरुणास ७.५१ लाख रुपयांचा गंडा! सेवानिवृत्त शिक्षकाची पोलिसांत धाव, दोघांवर गुन्हा

सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेत नोकरी लावतो, म्हणून दोघांनी एका तरुणास साडेसात लाख रुपयाला गंडा घातला आहे. सेवानिवृत्त शिक्षकाने मुलाला शिक्षक म्हणून नोकरी लागतेय म्हटल्यावर निवृत्तीची रक्कम दिली. त्या दोघांनी ना नोकरी लावली ना पैसे परत दिले. त्यांच्यावर आता विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील एका नामांकित शाळेत नोकरी लावतो, म्हणून दोघांनी एका तरुणास साडेसात लाख रुपयाला गंडा घातला आहे. सेवानिवृत्त शिक्षकाने मुलाला शिक्षक म्हणून नोकरी लागतेय म्हटल्यावर निवृत्तीची रक्कम दिली. त्या दोघांनी ना नोकरी लावली ना पैसे परत दिले. त्यांच्यावर आता विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वरी नगरातील दोघांनी फसवणूक केली आहे. विजयपूर रोडवरील सिंधु नगरातील निवृत्त शिक्षक संगप्पा जकप्पा नंदुरकर यांच्या मुलाचे डीएड झाले आहे. त्याला पूर्व भागातील चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी लावतो असे दोघांनी आमिष दाखविले होते. शाळेचे नाव ऐकून संगप्पा नंदुरकर यांनी त्या दोघांवर विश्वास ठेवला. गुन्ह्यातील संशयित आरोपी शिवानंद काशिनाथ निंबाळकर याने नोकरीसाठी १० लाख रुपये ठरविले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीच्या पत्नीने शंकुतला काशिनाथ निंबाळकर यांच्या नावे दोन लाख ५१ हजारांचा धनादेश दिला.

संशयित आरोपींनी तो धनादेश वटवून पैसे काढून घेतले. दोन महिन्यांनी शिवानंद निंबाळकर याने आणखी पाच लाख रुपये मागितले. त्यावेळी मुलाला नोकरी लागेल या आशेने फिर्यादी संगप्पा यांनी निवृत्तीची रक्कम काढून संशयितास त्याच्या घरी नेऊन दिली. पण, अनेक महिने होऊनही नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे काही महिन्यांनी संगप्पा यांनी दिलेली रक्कम परत मागायला सुरुवात केली. पण, त्यांनी रक्कम परत न दिल्याने संगप्पा नंदुरकर यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली.

खात्यात पैसे नसताना दिले धनादेश

मुलगा अविनाश नंदुरकर याला नोकरी लावतो म्हणून दोघांनी पैसे घेतले. पण, त्यांनी नोकरी लावली नाही. फिर्यादीने दोघांकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी दोन धनादेश दिले. मात्र, संशयितांच्या बॅंक खात्यात तेवढी रक्कम नसल्याने दोन्ही धनादेश बाऊन्स झाले. शेवटी, फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा हवालदार यांच्या हस्ताक्षर-स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी होणार

SCROLL FOR NEXT