पंढरपूरच्या तरुणावर मोहोळ येथे तलवारीने हल्ला! गुन्हा दाखल Gallery
सोलापूर

पंढरपूरच्या तरुणावर मोहोळ येथे तलवारीने हल्ला! गुन्हा दाखल

पंढरपूरच्या तरुणावर मोहोळ येथे तलवारीने हल्ला! गुन्हा दाखल

राजकुमार शहा

मोहोळ येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयितांना सोडविण्यासाठी मदत का करतोस, असे म्हणून सात जणांनी तलवार, लोखंडी गज व काठीने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला.

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ (Mohol) येथील दुहेरी खून (Crime) प्रकरणातील संशयितांना सोडविण्यासाठी मदत का करतोस, असे म्हणून सात जणांनी तलवार, लोखंडी गज व काठीने एका युवकावर प्राणघातक हल्ला केला. नवनाथ दगडू गायकवाड (रा. संत पेठ पंढरपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना 16 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (Solapur-Pune National Highway) एका हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी 18 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा मोहोळ पोलिसात (Mohol Police) सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास बनसोडे, विनोद कांबळे, राहुल ऊर्फ दादा क्षीरसागर, बाळू क्षीरसागर ऋषी क्षीरसागर, चिम्या बनसोडे, भैय्या क्षीरसागर (सर्व रा. सिद्धार्थ नगर, मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेमुळे मोहोळ शहरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नवनाथ दगडू गायकवाड (रा. संत पेठ, पंढरपूर) आणि मोहोळ येथील शिवसैनिकाच्या दुहेरी खून प्रकरणात अटकेत असलेले संतोष सुरवसे व रोहित फडतरे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी नवनाथ गायकवाड हा प्रयत्न करीत आहे. यामुळे वरील सातजण त्याच्यावर चिडून होते.

16 सप्टेंबर रोजी नवनाथ गायकवाड हा पंढरपूरला जाण्यासाठी मोहोळ बस स्थानकाच्या गेटवर थांबला होता. त्यानंतर तो लघुशंकेसाठी सोलापूर-पुणे महामार्गावर गेला होता. यावेळी सहा ते सात लोक हातात काठ्या, लोखंडी गज व तलवार घेऊन त्याच्या दिशेने येऊ लागल्याचे त्याला दिसताच तो पुढे पळू लागला. मात्र एका हॉटेलच्या अलीकडे या सात लोकांनी त्याला घेराव घालून "संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांच्यासोबत का फिरत होतास, त्यांनी आमच्या गल्लीतील दोघांचा खून केला आहे, तू त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत का करतोस?' असे म्हणून त्याच्यावर तलवार, लोखंडी गज व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. यावेळी एक चारचाकी वाहन आल्याचे पाहून हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर नवनाथ गायकवाड याच्या मित्राने त्यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले.

दरम्यान, 18 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नवनाथ गायकवाड याने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सात जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT