सोलापूर

विद्यार्थ्यांच्या आधारकार्डावर अतिरीक्त शिक्षकांचे भवितव्य

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शाळेतील किती विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शासकीय पोर्टलवर उपलब्ध आहेत, त्यानुसार 2020-21 या शैक्षणिक वर्षात सेवकसंच निश्‍चिती केली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत केलेले नाही, त्यांना शाळेच्या पटसंख्येत गणले जाणार नाही. त्यामुळे आपापल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत करावेत, अशा सूचना महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीतील सर्व महापालिका व खासगी शाळांतील मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. 

शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक पालक आणि शाळेत उपलब्ध असतात. मात्र शिक्षण विभागाच्या पोर्टलवर ते अद्ययावत केले जात नाहीत. त्यामुळे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देतेवेळी अडचणी येतात. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक शाळेत उपलब्ध असतोच, तो तिथे नसेल तर पालकाकडे असतो. त्यामुळे हा क्रमांक पोर्टलवर अद्ययावत करावा लागणार आहे. त्यानुसारच विद्यार्थ्यांची संख्या निश्‍चित करून सेवकसंच निश्‍चित केले जाणार आहेत. या माध्यमातून अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा उद्देश आहे. पण आधारक्रमांक वेळेवर अद्ययावत न झाल्यास त्या विद्यार्थ्यांची गणना पटसंख्येत केली जाणार नाही, परिणामी अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनावेळी अडचणी येऊ शकतात, किंबहुना अशा शिक्षकांचे भवितव्य हे आधारकार्ड असूनही त्याची नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांवरच असणार आहे. 

सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सुमारे 68 शाळा आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत या शाळांतही आता डिजीटल क्‍लास, अद्ययावत प्रयोगशाळांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच या सर्व सुविधा मोफत असल्याने सरकारी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. परिणामी या शाळांतही आता विद्यार्थ्यी संख्या वाढू लागली आहे. मात्र आता या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अद्ययावत करणे आवश्‍यक आहे. अन्यथा या शाळांतील विद्यार्थ्यांचीही संख्या कमी दिसू शकते. महापालिकेच्या शाळांमध्ये गरीब व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढायचे झाल्यास त्यानुसार संबंधित शिक्षकांना तशी कार्यवाही करावी लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT