शहरातील नागरिकांमध्ये 80 टक्‍के अँटीबॉडीज ! सिरो सर्व्हेचा प्राथमिक अंदाज
शहरातील नागरिकांमध्ये 80 टक्‍के अँटीबॉडीज ! सिरो सर्व्हेचा प्राथमिक अंदाज Canva
सोलापूर

शहरातील नागरिकांमध्ये 80 टक्‍के अँटीबॉडीज! सिरो सर्व्हेचा अंदाज

तात्या लांडगे

नागरिकांमध्ये कोरोनाच्या विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद (अँटीबॉडीज) किती प्रमाणात आहे, त्यांच्यात सामूहिक प्रतिकारकशक्‍ती किती टक्‍के आहे, याची पडताळणी सिरो सर्व्हेतून केली जात आहे.

सोलापूर : शहरातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या (Covid-19) विषाणूविरुद्ध लढण्याची ताकद (Antibodies) किती प्रमाणात आहे, त्यांच्यात सामूहिक प्रतिकारकशक्‍ती (Immunity) किती टक्‍के आहे, याची पडताळणी सिरो सर्व्हेतून (Ciro Survey) केली जात आहे. 10 वर्षांवरील विविध वयोगटातील व परिसरातील एकूण एक हजार व्यक्‍तींच्या रक्‍ताचे नमुने घेतले जात असून, त्यापैकी आठशे नमुन्यांची पडताळणी झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यांच्यात 80 टक्‍के अँटीबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) माध्यमातून काही जिल्ह्यांमध्ये सिरो सर्व्हे केला जात आहे. त्यामध्ये सोलापूर शहर व ग्रामीणचाही समावेश असून शहरातील एक हजार तर ग्रामीणमधील एक हजार व्यक्‍तींच्या रक्‍ताचे नमुने घेतले जाणार आहेत. विविध वयोगटातील, विविध परिसरातील व्यक्‍तींचे रॅन्डमली नमुने घेतले जाणार असून प्रत्येक तालुक्‍यातून किमान 270 नमुने अपेक्षित आहेत. त्यामध्ये कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस, दुसरा डोस घेतलेल्यांसह लस न घेतलेल्यांचाही समावेश आहे. सध्या शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्र परिसरातील प्रत्येकी 70 जणांचे रक्‍ताचे नुमने घेतले जात आहेत. आतापर्यंत आठशे नमुने संकलित करून त्यावर डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र व जीवरसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून स्टडी केला जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत रुग्णवाढ व मृतांमध्ये सोलापूर जिल्हा देशपातळीवर टॉप टेनमध्ये राहिला. आता तिसऱ्या लाटेपूर्वी ठोस उपाययोजनांच्या अनुषंगाने हा सर्व्हे हाती घेण्यात आला आहे.

सिरो सर्व्हेत 'यांची' मेहनत

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो सर्व्हेचे काम सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. रमाकांत गोखले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. नसिरा शेख, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. कमलाकर माने, नोडल ऑफिसर डॉ. अग्रजा चिटणीस आणि डॉ. संतोष हराळकर व डॉ. पूनम संचेती हे त्यावर काम करीत आहेत.

तिसऱ्या लाटेपूर्वी वाढली रोगप्रतिकारक शक्‍ती

शहरातील 18 वर्षांवरील साडेसात लाख व्यक्‍तींपैकी चार लाखांपर्यंत व्यक्‍तींना प्रतिबंधित लसीचा पहिला डोस टोचण्यात आला आहे. त्यापैकी दोन लाखांपर्यंतच्या व्यक्‍तींना दुसरा डोस टोचला आहे. प्रतिबंधित लस टोचलेल्यांसह कोरोनामुक्‍त झालेल्यांमध्ये जवळपास 80 टक्‍के अँटीबॉडीज तयार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तर दुसरीकडे त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींसह 10 वर्षांवरील व्यक्‍तींमध्येही कोरोनाविरुद्ध लढण्याची ताकद आल्याचेही स्पष्ट झाले आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर कोणत्या परिसरातील, कोणत्या वयोगटातील, एक अथवा दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्‍ती कोरोनाविरुद्ध लढण्यास अधिक तंदुरुस्त आहेत, या बाबींची उकल होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT