mohol nagarparishad 
सोलापूर

मोहोळच्या नगराध्यक्षासाठी उद्या अर्ज स्वीकृती, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 25 सप्टेंबरला निवडीची सभा 

प्रमोद बोडके

सोलापूर : मोहोळच्या नगराध्यक्षा सरिता उर्फ वंदना संतोष सुरवसे यांनी नगराध्यक्षपदाचा 20 मार्च रोजीच राजीनामा दिला आहे. नवीन नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया लॉकडाऊनमुळे रखडली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला असून याबाबतचा आदेश त्यांनी शनिवारी (ता. 19) रात्री उशिरा काढला आहे. नगराध्यक्षपदासाठी उद्या (सोमवार, ता. 21) सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत अर्ज स्वीकृती होणार आहे. या निवडणूकीमुळे ऐन कोरोनाच्या काळात मोहोळचे राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. 

उद्या प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी त्याच दिवशी दुपारी दोन नंतर होणार आहे. फेटाळण्यात आलेल्या अर्जांची यादी उद्याच सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल चार दिवसांची मुदत देण्यात आली असून 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणूक लढणाऱ्या अंतीम उमेदवारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहेत. 

नगराध्यक्ष निवडीसाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलविण्यात आली आहे. ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. येथील नगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan Heirs : टिपू सुलतानचे वंशज चक्क चालवतात रिक्षा, सोन्या चांदीत लोळणारे राजघराणे एक-एक रुपयाला झालेत लाचार, आता कुठे आहेत

Kankavli Firing Case : कणकवलीत गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिकाचा खून, अवघ्या २१ वर्षीय तरूणाने केला खून; खुनाचे नेमकं कारण काय?

Latest Marathi News Live Update : हातकणंगले तालुक्यात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडे

Crude Oil: तेलाचा दर 2022 इतकाच… तरी भारतासाठी 24% महाग का? आणि दर कमी झाले तरी पेट्रोल का स्वस्त होत नाही?

Shivaji Maharaj Navy : होर्मुज पार करायची शिवरायांची जहाजे! चक्क 'या' देशात पोहचलं होतं मराठा आरमार! ३ मोठ्या ऐतिहासिक नोंदी समोर

SCROLL FOR NEXT