Accident News esakal
सोलापूर

Accident News: विजयपूरमध्ये भीषण अपघातात ४ ठार; तर तीन जण जखमी, सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली अन्...

Accident News: विजयपूरहून जमखंडीकडे जाणाऱ्या कारला (केए २८ डी १०२१) सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने (के. ए. १६ बी. ६४७२) धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

विजयपूर: जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी गावाजवळ आज (ता. १३) पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन पुरुष, एका महिलेसह मुलाचा समावेश आहे.

विजयपूरहून जमखंडीकडे जाणाऱ्या कारला (केए २८ डी १०२१) सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकने (के. ए. १६ बी. ६४७२) धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले.

अर्जुन कुशलसिंग राजपूत (वय ३२, रा. बरटगी तांडा, तिकोटा तालुका, विजयपूर) रविनाथ सुनील पत्तार (वय ५२, रा. मुधोळ, जिल्हा बागलकोट), पुष्पा रवि पत्तार (वय ४०, रा. मुधोळ जिल्हा बागलकोट) आणि विजयपूर शहरातील रहिवासी मेघराज अर्जुनसिंग रजपूत (वय १२) या चौघांचा मृत्यू झाला. जयश्री अर्जुन रजपूत, नायरा अर्जुन रजपूत आणि प्रेमसिंग अर्जुन रजपूत जखमी झाले. हे सर्व विजयपूर जिल्ह्यातील आहेत. त्यांना विजयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बबलेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढले. पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे व इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी बबलेश्वर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

SCROLL FOR NEXT