Kshirsagar 
सोलापूर

पंढरपुरात सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा अपघाती मृत्यू

भारत नागणे
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर (वय 35) यांचा आज बुधवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास अपघाती मृत्यु झाला. पंढरपूरपासून जवळच असलेल्या कोर्टी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर हे आज महदूच्या दिशेकडून ते पंढरपूरकडे येत होते. या मार्गावर पहाटेच्या सुमारास भरधाव असलेल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात पडून अपघात झाला. यामध्ये श्री. क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला.

सहा ते सात महिन्यांपूर्वीच ते शहर पोलिस ठाण्यात रुजू झाले होते. त्यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील असल्याचे समजते. मनमिळावू स्वभावाचे असलेले क्षीरसागर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT