3accc.png 
सोलापूर

हमालीसाठी येताना दोघांचा अपघाती मृत्यू ! सोलापूर- विजयपूररोडवरील घटना  

तात्या लांडगे

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील वडकबाळ येथील यासिन गुलाब शेख (वय 30) तर वांगीतील सत्तार गुलाब मुल्ला (वय 35) हे दोघे दुचाकीवरुन सोलापुरात येत होते. गावापासून दहा किलोमीटर अंतरावर विजयपूर जकात नाक्‍याजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला असून त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची विजापूर नाका पोलिसांत नोंद झाली आहे. 

तपास अधिकारी म्हणाले... 

  • अपघातात मृत दोघेही करीत होते हमालीचे काम 
  • एक दक्षिण सोलापुरातील वडकबाळ तर दुसरा वांगी येथील रहिवासी 
  • अपघातात दुचाकीचा चक्‍काचूर; अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज 
  • सकाळी पाच ते साडेसहाच्या सुमारास अपघात झाला 
  • दुचाकी भरधाव वेगाने चालवित असल्याचा अंदाज; अपघातातनंतर मासे पडले रस्त्यावर

अपघातात मृत यासिन शेख व सत्तार मुल्ला दोघेही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोलापुरात हमालीचा व्यवसाय करीत होते. त्यातील एक कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचा व्यवसाय करीत होता, अशी माहिती पोलिस तपासांत समोर आल्याची माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी महादेव बेंबळे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. ही घटना सकाळी पाच ते साडेसहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा शोध सुरु असल्याचेही ते म्हणाले. हमालीतून चार पैसे मिळतील म्हणून दोघेही बाजार समितीतील लिलाव सुरु होण्यापूर्वी पोहचता येईल म्हणून घाईघाईने सोलापुरकडे येत होते. अपघातावरुन त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. पुढील तपास सुरु असल्याचेही श्री. बेंबळे म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT