one side love 
सोलापूर

एकतर्फी प्रेमात दोघे मरु म्हणाला अन्‌.... 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून जाळून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी शरद मारुती गायकवाड (रा. जामगाव बु., ता. मोहोळ) याला विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना 21 एप्रिल 2016 रोजी घडली होती. 

12 साक्षीदार तपासण्यात आले
पळून जाऊन लग्न करु असा तगादा आरोपी शरद गायकवाडने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे सहा महिन्यांपासून लावला होता. त्यावेळी तिने स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान, 21 एप्रिल 2016 मध्ये घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून आरोपी शरद घरात घुसला. त्यावेळी त्याने मुलीला पळून जाऊन लग्न करायचे का, अशी विचारणा केली. मात्र, त्यावेळी मुलीने स्पष्ट शब्दात त्याला नकार दिला. त्यावेळी त्याने आपण मरुयात म्हणत घरातील कॅनमधील रॉकेल दोघांच्या अंगावर ओतले. घरातील स्टोव्हवर शरद गायकवाड याने त्या मुलीला ढकलले आणि स्वत: तेथून पसार झाला. त्यामध्ये मुलगी पूर्णपणे भाजली होती. तिचा आवाज आल्याने तिची आई, मामा त्याठिकाणी पोहचले. त्यांनी तिला तत्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, पोलिस हवालदार ज्योतीबा पवार यांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. 22 एप्रिलला कामती पोलिस ठाण्यात शरद गायकवाडविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये तपास अधिकारी श्री. पवार यांच्यासह मुलीची आई व मामाचे जबाब महत्त्वपूर्ण ठरले. सरकारी वकील गंगाधर रामपुरे यांचा युक्‍तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरीत आरोपी शरद गायकवाड याला जन्मठेप ठोठावली. 


महिला दिनापूर्वी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल 
8 मार्चला जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. तत्पूर्वी, विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा जाळून खून करणारा आरोपी शरद गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चार वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा निकाल न्यायालयाने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 7) दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT