crime esakal
सोलापूर

बालिकेवर लैगिंक अत्याचार; आरोपीला 14 वर्षांचा कारावास

पिडीतेला एक लाखांची भरपाई देण्याचेही न्यायालयाचे आदेश

तात्या लांडगे

पिडीत बालिकेच्या पुनर्वसनासाठी एक लाखांची नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी आदेश दिले.

सोलापूर : सहा वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विठ्ठल हरी नलावडे (रा. आष्टी, ता. मोहोळ) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी 14 वर्षांची सक्‍तमजुरी व दहा हजार दंडाची शिक्षा ठोठावली. पिडीत बालिकेच्या पुनर्वसनासाठी एक लाखांची नुकसान भरपाई देण्याचेही त्यांनी आदेश दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळकरी मुलगी शाळेच्या गेटजवळ खेळत होती. 18 जानेवारी 2017 रोजी दुपारी दीडच्या सुमारास आरोपीने त्या चिमुकलीला पैशाचे आमिष देऊन निर्जनस्थळी नेले. तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केले. पिडीत मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर तिच्या आईचे तिकडे लक्ष गेले. त्यावेळी परिसरातील लोकही त्याठिकाणी धावले. त्यावेळी आरोपी हा त्या चिमुकलीला तिथेच सोडून पसार झाला. पिडीत बालिकेला सर्वांनी धीर देऊन विचारले, त्यावेळी पैशाचे अमिष देऊन अत्याचार केल्याचे चिमुकलीने सांगितले. पिडीतेच्या आईने आरोपी विठ्ठल नलावडेविरुध्द मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. आरोपीविरुध्द अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधित कायद्याअंतर्गत व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी अभय डोंगरे यांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत, सहायक सरकारी वकील गंगाधर रामपुरे, ऍड. शैलजा क्‍यातम यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे ऍड. व्ही. डी. फताटे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार सोलनकर यांची मदत झाली.

ठळक बाबी...

- लैंगिक अत्याचार प्रकरणात एकूण 12 साक्षीदारांची झाली तपासणी

- बालिकेची साक्ष नोंदविण्यासाठी लागले दहा दिवस

- पिडीत चिमुकलीला बोलके करण्यासाठी न्यायालयाकडून बडबड गीते, चित्रकला, खेळण्याचा झाला वापर

- पिडीत मुलगी, तिची आई, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली

- घटनास्थळावरून जप्त केल्या बालिकेच्या बांगड्याचे तुकडे; आरोपीच्या कपड्यावरही होती माती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT