Accused who came on parole commit sucide over husband wife family dispute solapur police sakal
सोलापूर

Solapur Crime News : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पॅरोलवर आलेल्या आरोपीने घेतला गळफास"

पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका 41 वर्षीय प्रौढाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

राजकुमार शहा

मोहोळ : पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका 41 वर्षीय प्रौढाने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खुनेश्वर ता मोहोळ येथे गुरुवार ता 26 च्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वैभव कालिदास मगर रा. खुनेश्वर असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत वैभव यास पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्या वेळचे मोहोळ पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांनी पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते.

त्या पार्श्वभूमीवर मृत वैभव यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. तो खुनेश्वर गावी रजेवर आला होता. वैभव याची पहिली पत्नी मृत झाल्यानंतर त्याने तिच्याच बहिणीशी सन 2019 मध्ये मुंबई येथील एका मंगल कार्यालयात विवाह केला होता. दरम्यान विवाह झाल्यानंतर वैभव याला दोन महिन्यातच पहिल्या पत्नीच्या खुना बाबत जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

वैभव याला गावी आल्यानंतर एक दिवसाआड तामलवाडी ता तुळजापूर येथे हजेरी देण्या करीता जावे लागत होते. तो तामलवाडी येथे हजेरी देण्यास गेला असता त्याने आई निर्मलाला फोन केला व मी येतो तो पर्यंत जेवण तयार करून ठेव असे सांगितले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत वैभव न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही.

दरम्यान वैभव ची नातेवाईक असलेली श्रीमती शैला या शेतातील देवाची देवपूजा करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. त्यावेळी शेतातील चिंचेच्या झाडाला वैभव ने दोरीच्या साह्याने गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. श्रीमती शैला यांनी ही घटना नातेवाईकांना सांगितली.

दरम्यान मृत वैभव यांच्या खिशात दोन पानी चिठ्ठी सापडली असून, त्यात माझ्या मृत्यूस माझी पत्नीच जबाबदार असून तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चा गुन्हा दाखल करावा व ही चिठ्ठी च माझी फिर्याद समजावी असा स्पष्ट उल्लेख केला आहे. या घटनेची खबर भिकाजी सोपान चव्हाण वय 52 रा खुनेश्वर यांनी मोहोळ पोलिसात दिले असून या घटनेचा अधिक तपास सध्याचे सहाय्यक फौजदार राजू राठोड करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Independence Day : पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच पसरली शोककळा, हवेत गोळीबारात चिमुकलीसह ३ ठार, ६५ गंभीर जखमी

Chh. Sambhajinagar: “मैं जा रहा हूँ” असा मेसेज पाठवून २३ वर्षीय युवकाने संपवले जीवन; वाळूज एमआयडीसी परिसर हादरला

Satara News: अकरावी प्रवेशासाठी आता ‘विशेष फेरी’; मंगळवारपासून प्रवेश निश्‍चित करता येणार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Maharashtra Education: शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होतेय खिचडी; एकच शिक्षक शिकवताहेत दोन-तीन विषय, भरती ठप्प झाल्याचा परिणाम

माेठी बातमी!'सातारा जिल्ह्यातील ८४ हजार बहिणी अपात्र'; चुकीच्या पद्धतीने घेतला १५१ कोटींचा लाभ, जिल्ह्यात खळबळ

SCROLL FOR NEXT