solapur sakal
सोलापूर

Solapur News : फुकट्या प्रवाशांकडून २१३ कोटी वसूल

आठ महिन्यातील कारवाई : मध्य रेल्वे देशात अव्वल

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विनातिकीट आणि अवैध प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत २१३ कोटी १६ लाख रुपयांचा महसूल मिळविला आहे. देशातील सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये मध्य रेल्वेने अव्वल क्रमांक मिळविला आहे.

मध्य रेल्वेमध्य रेल्वेने अनियमित प्रवासाच्या एकूण ५ लाख प्रकरणांची नोंद केली आहे ज्यात विनातिकीट आणि अनियमित तिकिटांची ४ लाख ८८ हजार प्रकरणे आणि सामानाच्या बुक न केलेल्या व अनियमित बुकिंगच्या १३ हजार प्रकरणांचा समावेश आहे.

विनातिकीट आणि अनियमित तिकिटांच्या प्रकरणांमधून ३६ कोटी ८२ बुक न केलेल्या आणि सामानाच्या अनियमित बुकिंगच्या प्रकरणांमधून १६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. विनातिकीट किंवा अवैध तिकीट असलेल्या प्रवाशांवर रेल्वे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली आणि दंड आकारण्यात आला आहे.एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत एकूण ५७१ दंडाधिकारी तपासण्या करण्यात आल्या.

या तपासण्यांमधून ९ हजार ७१८ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आणि ५० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीतील ४७८ दंडाधिकारी तपासण्या झाल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ या महिन्यात १ हजार २३४ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT