Gutkha 
सोलापूर

पान मसाला, सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक ! पंढरपुरात 35 लाखांचा मुद्देमाल जप्त 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : दोन वाहनांतून बेकायदेशीररीत्या विमल पान मसाला, व्ही. तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम. सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई काल (शुक्रवारी) रात्री साडेआठ वाजता सरगम चौक येथे करण्यात आली. सुमारे दहा लाख रुपये किमतीची दोन वाहने आणि त्यातील 25 लाख 17 हजार 600 रुपयांचा माल असा एकूण 35 लाख 17 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणाची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, सागर दत्तात्रय महाजन (रा. नागझरवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) व रवींद्र रामचंद्र दिवार, आळंद मातोबा (ता. हवेली, जि. पुणे) हे वाहन क्र. एमएच 13 एसएफ 4146 व एमएच 12 क्‍यू डब्ल्यू 0857 या दोन वाहनांमधून विमल पान मसाला, व्ही. तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम. सुगंधित तंबाखू बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शहरातील सरगम चौक येथे पोलिसांनी मालासह दोन्ही वाहने ताब्यात घेतली. 

पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना पत्राद्वारे कळवल्यानंतर त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन जप्त केलेला साठा जप्ती पंचनामा करून सील करून ताब्यात घेतला. आरोपी वाहन चालक सागर दत्तात्रय महाजन, रवींद्र रामचंद्र दिवार, योगेश काळभोर (साठा मालक), विष्णू प्रजापत (वाहन मालक), नीलेश काळभोर (वाहन मालक) यांच्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायदा शिक्षापात्र कलम 59 व भादंवि कलम 188, 272, 273, 328, 34 प्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी संबंधित आरोपींच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पंढरपूर येथे गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भातील आवश्‍यक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. 

सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत, असे आवाहन पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी या वेळी केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : आदित्य ठाकरेंकडून कायदेशीर नोटिसीला उत्तर, सतीश सालियन यांचे आरोप फेटाळले

Rare Albino Snake : काळा नाहीतर चक्क पांढराशुभ्र! सिंधुदुर्गातील पावशीत आढळला अत्यंत दुर्मीळ विषारी 'अल्बिनो मण्यार'; गुळगुळीत शरीर अन्.. काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT