Ujani Boat 
सोलापूर

उजनीतील अवैध वाळू उपशावर धडक कारवाई ! तीन यांत्रिक बोटी केल्या नष्ट; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : ढोकरी (ता. करमाळा) येथील उजनी जलाशय परिसरात भागवत पाटील यांच्या वस्तीजवळ अनधिकृतपणे वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या तीन यांत्रिक बोटींवर महसूल विभागाच्या पथकाने धाडसी कारवाई केली आहे. या ठिकाणी तीन बोटी व तीन सक्‍शन बोटी अनधिकृतपणे वाळू उपसा करताना दिसून आल्या. त्यांना वाळू उत्खनन करताना पकडण्यात आले. परंतु, त्यातील एक बोट अंधाराचा फायदा घेऊन पाण्यातून पळवून नेण्यात आली. या ठिकाणी 40 लाख रुपयांचा मुद्देमाल व संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. 

ही कारवाई तहसीलदार समीर माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकामध्ये निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ अधिकारी किरण खारव, रेवणनाथ वळेकर, तलाठी उमेश बनसोडे, मोहसीन हेड्डे, आनंदा डोणे, साईनाथ आडगटाळे, संजय शेटे, बाळासाहेब कांबळे, कोतवाल नितीन हत्तीकट, पोलिस पाटील अभिजित वळसे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल महेश बचुटे यांचा समावेश होता. 

पोलिसांनी कारवाईत झारखंड राज्यातील इमरान शेख, हानिफ शेख, नासीर शेख, कलू शेख या कामगारांना ताब्यात घेतले आहे. या बोटी विकास देवकर, तेजस सोनवणे, कुणाल खडके, गणेश लोंढे, बीजू साळुंके, गणेश इसगुडे (सर्व रा. इंदापूर) यांच्या असल्याचे या कामगारांनी सांगितले. सर्व कामगार व बोटी मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

उजनी जलाशय परिसरात होणारा अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी विविध पथके नेमली आहेत. ही पथके तालुक्‍यात सर्व ठिकाणी गस्त घालणार आहेत. वाळू चोरीत प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 
- समीर माने, 
तहसीलदार, करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT