corona 
सोलापूर

सोलापूर शहर व जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांनी ओलांडला 8 हजाराचा टप्पा 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा वाढू लागल्याचे समोर येत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 8 हजार 203 झाली आहे. ग्रामीण भागातील सात हजार 227 तर महापालिका हद्दीतील 976 अशा एकूण 8 हजार 203 रुग्णांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. 

जिल्ह्याच्या एकूण बाधितांच्या संख्येत आज 502 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 434 तर महापालिका हद्दीतील 68 बाधितांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सहा जणांचा करणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीतील एक व ग्रामीण भागातील 5 व्यक्तींचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार 396 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 314 तर महापालिका हद्दीतील 82 रुग्णांचा समावेश आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 31 हजार 289 झाली असून त्यामध्ये ग्रामीणमधील 23 हजार 104 तर महापालिका हद्दीतील 8 हजार 185 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना मुक्त झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या 21 हजार 987 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 99 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 633 महापालिका हद्दीतील 466 रुग्णाचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 139 अहवाल अद्यापही प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT