सलमान खान फाऊंडेशनची टीम विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरणप्रसंगी सर्व कर्मचारीवर्ग. Sakal
सोलापूर

सिनेअभिनेता सलमान खानने घेतलीय बार्शीची मुक-बधिर शाळा दत्तक!

दरवर्षी दिले जातात लाखों रुपयांची श्रवणयंत्रे

प्रशांत काळे

बार्शी - अन्नदान, रक्तदान करणारे अनेक दाते समाजामध्ये कार्यरत आहेत त्याप्रमाणे कुटुंबालाही सांभाळण्यास कठीण वाटणाऱ्या अपंग कर्ण-मुकबधिर मुलांना सांभाळणाऱ्या निवारा बहुउद्देशीय संस्थेला सिनेअभिनेता सलमान खानने मोठे दातृत्व दाखवत शाळा दत्तक घेऊन मागील सहा वर्षांपासून दरवर्षी लाखों रुपयांची श्रवणयंत्र शाळेला दिली आहेत यावर्षी साडेपाच लाख रुपयांचे 22 श्रवणयंत्रे मुलांना दिली.

शहरातील कुर्डुवाडी रस्त्यावर 1996 पासून निवारा बहुउद्देशीय संस्था संचलित मा.दिलीप सोपल मुकबधिर निवासी विद्यालय असून येथे 30 अपंग मुकबधिर विद्यार्थी पटसंख्या असते स्वर्गीय माजी नगराध्यक्ष हेमंत सोनवणे यांनी स्थापन केलेली ही संस्था सध्या माजी नगराध्यक्ष रमेश पाटील उत्कृष्टपणे चालवत आहेत. शाळेमध्ये कर्ण-मुकबधिर विद्यार्थी अठरा वर्षे वयापर्यंत निवासी असतो आठवीपर्यंत त्यास याच शाळेमध्ये शिक्षण दिले जाते वही,पेन,पुस्तके,युनिफॉर्म तसेच जेवणाची पूर्ण व्यवस्था, दवाखाना खर्च पूर्णपणे मोफत केला जात आहे.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींना महागडी श्रवणयंत्र खरेदी करणे शक्य नसल्याने शाळेने 2016 मध्ये सिनेअभिनेता सलमान खान यांच्या फाऊंडेशनशी संपर्क साधला होता आणि त्यावेळेस पासून आत्तापर्यंत दरवर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र त्यांची टीम प्रत्यक्ष येऊन पालक-शिक्षकांसमवेत वितरीत करीत आहेत. शाळेमधील अपंग मुक-बधिर मुलांना खडू,टेलरिंग,गणपती, आकाशकंदील तर मुलींना मेंदी,पार्लर असे व्यवसायिक प्रशिक्षणही दिले जात असल्याची माहिती माजी नगरसेविका तथा मुख्याध्यापिका रिझवाना शेख यांनी'सकाळ'शी बोलताना दिली.

पाच वर्षांच्या आतील कर्ण-बधिर मुला-मुलींचे ऑपरेशन करण्याची वेळ आली तर होली फॅमिली हॉस्पिटल बांद्रा मुंबई येथे किंवा लिलावती हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांची सोय करण्यात येते तेथील सुमारे आठ लाख रुपयांपर्यंतचा खर्च उद्योगपती रतन टाटा आणि सलमान खान करतात बार्शीच्या अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.

जिल्ह्यासह परराज्यातील मुलेही शाळेत असून त्यांना नववी पुढील शिक्षण लातूर किंवा पूणे येथे घेण्यासाठी शाळेमार्फत पाठवले जाते शिकून गेलेले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आजही व्हाट्स अॅपच्या माध्यमातून संपर्कात असून वर्षातून एकदा गेट टुगेदर करतात. वाचा उपचार तज्ञ विठ्ठल शिंदे, गोरख घळके, राजश्री गुजरे, तनविर काझी यांचेसह चौदा शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य उत्तमपणे पार पाडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT