सोलापूर

"आदर्श'ने केली प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभासदांना लाभांश वाटपाची मागणी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था कार्यरत आहे. ऑक्‍टोबर महिना सुरु झाली तरी या पतसंस्थेने सभासदांना लाभांश वाटप केला नाही. तो वाटप करावा याबाबतचे पत्र आदर्श शिक्षक समितीने पतसंस्थेच्या अध्यक्षांना दिले आहे. सभासदांना लाभांश वाटप न केल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. 

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी सप्टेंबरमध्ये सभासदांना लाभांश दिला जात होता. पण तो अद्यापही वाटप न झाल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. सहकार निबंधक कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार वार्षिक ताळेबंद तपासून संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करायचा आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अथवा ऑडिओ व्हिज्वल मिम्सद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन संस्थेच्या जवळपास आठ हजार सभासदांना त्वरित लाभांश वाटप करावा अन्यथा सोलापूर जिल्हा आदर्श शिक्षक समिती तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस विष्णू गोडगे यांनी दिली. पतसंस्थेच्या अध्यक्षांना निवेदन देताना सिद्धू सुतार, दीपक काळे, संजीव चाफाकरांडे, दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रमेश घंटेनवरू, धोत्री पतसंस्थेचे संचालक उमेश घागरे उपस्थित होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GOBAR-DHAN Scheme : पेट्रोलमध्ये इथेनॉल नंतर आता CNG-PNG मध्येही बायोगॅस मिसळला जाणार, सरकारची मोठी घोषणा

Dill Leaf Recipe: शेपूच्या पानांचा नवा ट्विस्ट! बनवा कर्नाटकातील प्रसिद्ध 'अक्की रोटी'

आजचे पंचांग 7 ऑगस्ट 2026! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - ७ ऑगस्ट २०२६

युरिक ॲसिड - शरीरात वाढणारी आम्लता

SCROLL FOR NEXT