Adding six new corona patients in Karmala city total number 31 
सोलापूर

करमाळा शहरात नवीन सहा रूग्णांची भर; एकूण संख्या 31 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात आज एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी नवीन सहा कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात तीन महिला व तीन पुरुष असून करमाळा शहरातील आहेत. आतापर्यंत एकूण 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. करमाळा शहर व तालुक्‍यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नागरिकांनी गर्दी टाकण्याचे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. 
कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती महसूल विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्यामुळे करमाळा तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे व तलाठी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार समीर माने यांनी सांगितले की, करमाळा शहर व तालुक्‍यातील 120 जणांची तपासणी रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यातील 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला असून त्या व्यक्तीला कोरोना संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार होते. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. लग्न सोहळे व इतर कार्यक्रम टाळावेत. अलिकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वंयशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या तालुक्‍यात वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी, मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT