corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीण मध्ये 223 नव्या कोरोना बाधितांची भर, आठ जणांचा मृत्यू

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 406 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 183 अहवाल निगेटिव्ह आले असून 223 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील आठ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 244 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 28 हजार 26 झाली आहे. त्यामध्ये 17 हजार 325 पुरुषांचा तर 10 हजार 691 महिलांचा समावेश आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आतापर्यंत 771 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 546 पुरुष व 225 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 442 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागात आत्तापर्यंत 22 हजार 813 जण कोरोना मुक्त झाले आहेत. आज मृत झालेल्या आठ व्यक्तींमध्ये वैरागमधील चाटी गल्ली येथील 62 वर्षीय महिला, मोहोळ मधील भाजी मंडई चौकातील 75 वर्षिय पुरुष, माढा तालुक्‍यातील रिधोरे येथील 73 वर्षीय पुरुष, बार्शी मधील परंडा रोड येथील 59 वर्षिय पुरुष, मोहोळ मधील साठे नगर येथील 69 वर्षिय पुरुष, अक्कलकोट तालुक्‍यातील कुडल येथील 20 वर्षीय महिला, बार्शीतील कसबा पेठ येथील 58 वर्षिय पुरुष व बार्शीतील सुभाषनगर येथील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 46 अहवाल प्रलंबित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT