Hospital Audit
Hospital Audit 
सोलापूर

बार्शी तालुक्‍यात कोरोनाबाधितांचे रोजच अर्धशतक; एकूण रुग्णसंख्या 1369

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरूच असून, दररोज रुग्णांचे अर्धशतक होत आहे. मंगळवारी 435 प्राप्त झालेल्या स्वॅब व रॅपिड अँटिजेन तपासणी अहवालामध्ये 52 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांची एकूण संख्या एक हजार 369 झाली आहे. ग्रामीणमधील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार डी. बी. कुंभार यांनी दिली.

हेही वाचा : "या' गावात होतेय विलगीकरण केलेल्या आशा वर्कर्सची हेळसांड

मंगळवारी शहरातील 285 व ग्रामीणमधील 150 अहवाल असे 435 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 29 व ग्रामीणमधील 23 असे 52 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 24 तर ग्रामीणमधील 22 अशा 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 248 रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवालात 28 जण पॉझिटिव्ह तर ग्रामीणमधील 144 टेस्टमध्ये 23 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 256 व ग्रामीणमधील 127 असे 383 जण निगेटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत शहरात 786 तर ग्रामीणमध्ये 583 असे एकूण 1 हजार 369 जण कोरोनाबाधित आहेत.

हेही वाचा : बार्शीनंतर आता वैरागमध्ये "इतक्‍या' लाखांचा रेशनचा गहू, तांदूळ जप्त

शहरातील बारबोले प्लॉट, तुळजापूर रोड, दत्तनगर, जैन मंदिराजवळ, कापसे बोळ, देशमुख प्लॉट, बारंगुळे प्लॉट, रोडगा रस्ता, चाटे गल्ली, खुरपे बोळ, वाणी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण तर झाडबुके मैदान चार, सुलाखे हायस्कूल रोड दोन, 422 गाडेगाव रोड दोन, भीमनगर चार, सिद्धार्थ नगर दोन, कोष्टी गल्ली तीन, बारबोले प्लॉट असे 29 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागातील राळेरास 13, वैराग, भालगाव, उंबरगे, कोरफळे येथे प्रत्येकी एक तर खामगाव चार असे 23 जण नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 233 व ग्रामीण भागातील 177 अशा 410 जणांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 913 जण उपचारात बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये शहरातील 529 तर ग्रामीण भागातील 384 जण आहेत.

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT