Siddheshwar Sahakari Sugar Factory esakal
सोलापूर

सिद्धेश्वर साखर कारखान्याची 'ती' मागणी फेटाळली; विमानतळाच्या जागेचा वाद पुन्हा उफाळणार, काय आहे प्रकरण?

Siddheshwar Sahakari Sugar Factory : विमानतळाच्या वतीने ॲड. अखिलेश देशपांडे व कारखान्याच्या वतीने ॲड. नीलेश ठोकडे यांनी बाजू मांडली.

सकाळ डिजिटल टीम

कारखान्याने मोजणीवर कोणताही आक्षेप न घेतल्याने या प्रकरणात स्थगिती देण्याचे व आदेश जैसे थे ठेवण्यास काहीही अर्थ नसल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची ही मागणी फेटाळून लावली आहे.

सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (Siddheshwar Sugar Factory) व होटगी रोड विमानतळ (Hotgi Road Airport) यांच्या वादात असलेल्या एक हेक्टर १७ आर जागेचा निकाल प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी विमानतळाच्या बाजूने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात कारखान्याने अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर काल सुनावणी झाली.

या जागेच्या निर्णय स्थगिती किंवा जैसे थे ठेवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी कारखान्याने केली होती. ही मागणी आजच्या सुनावणीत फेटाळली आहे. या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच प्रांताधिकारी पडदुणे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाने (North Solapur Tehsil Office) विमानतळाला एक हेक्टर १७ आर जागेचा ताबा विमानतळ प्राधिकरणाला दिला आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह या रजेवर होत्या. आज त्या कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली.

विमानतळाच्या वतीने ॲड. अखिलेश देशपांडे व कारखान्याच्या वतीने ॲड. नीलेश ठोकडे यांनी बाजू मांडली. कारखान्याचे वकील ॲड. ठोकडे म्हणाले, १९८४ पासून ही जागा कारखान्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेला अतिक्रमण म्हणता येणार नाही. कारखान्याला मोजणी प्रक्रियेवर आक्षेप होता, तर त्यांनी या मोजणी विरोधात तक्रार का केली नाही?, असा सवाल अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी विचारला. कारखान्याने मोजणीवर कोणताही आक्षेप न घेतल्याने या प्रकरणात स्थगिती देण्याचे व आदेश जैसे थे ठेवण्यास काहीही अर्थ नसल्याने अपर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची ही मागणी फेटाळून लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईलही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT