Remdesivir 
सोलापूर

ग्रामीण व सर्वोपचार रुग्णालयात पुरेसे रेमडेसिव्हिर ! महापालिकेकडे एक हजार इंजेक्‍शन

तात्या लांडगे

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, महापालिका आणि ग्रामीणमधील रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. रुग्णांना गरजेनुसार त्याचा पुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

महापालिकेकडे एक हजार इंजेक्‍शन 
महापालिकेच्या बॉईज आणि वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अतितीव्र अथवा तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची गरज भासते. या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वी आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक हजार इंजेक्‍शन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रेमडेसिव्हिरचा तुटवडा असल्याची बाब चुकीची असून, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर, उपायुक्‍त धनराज पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांसाठी लागणाऱ्या औषध- गोळ्या पुरवठ्याचे नियोजन केल्याचे आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते यांनी सांगितले. 

अन्न व औषध प्रशासनाच्या नोंदीनुसार जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांकडे सध्या एक हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही रुग्णालयांकडून त्याची माहिती लपविली जात असल्याची चर्चा सुरू आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला तीन ते सात दिवसांत रेमडेसिव्हिरचे इंजेक्‍शन दिले जाते. त्याचा सलग चार दिवसांचा कोर्स असून एका रुग्णासाठी किमान चार ते पाच इंजेक्‍शनची गरज भासते. या पार्श्‍वभूमीवर बार्शीतील उपजिल्हा रुग्णालयास 50 तर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयास 150 रेमडेसिव्हिर देण्यात आल्याचेही डॉ. ढेले यांनी सांगितले. रुग्णांना आवश्‍यक त्या वेळी इंजेक्‍शन देण्यात येईल, कोणताही तुटवडा नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

Sonu Nigam Concert : पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच; सोनू निगम लाईव्ह कॉन्सर्ट, १० मे

SCROLL FOR NEXT