Advance of one lakh Rs has been sanctioned to the security police 
सोलापूर

पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय! बंदोबस्तावरील पोलिसांना एक लाखाचा अग्रीम मंजूर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी आणि राज्यातील जनता सुरक्षित राहावी या हेतूने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रस्त्यांवर पहारा देणाऱ्या पोलिसांना आता एक लाख रुपयांचा अग्रीम (उचल) मिळणार आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनी आज (बुधवारी) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सुमारे साडेतीनशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना या विषाणूची लागण झाली आहे. स्वतःच्या जीवाची तथा कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यांवर बंदोबस्तासाठी आहेत. कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यात पोलिसांचा मोठा वाटा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. त्यांच्या आदेशानुसार बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस कल्याण निधीतून आता प्रत्येकी एक हजार रुपयांची उचल मिळणार आहे. तसेच कोणत्याही पोलीस अधिकारी तथा कर्मचाऱ्यांना 12 तासांपेक्षा ड्युटी दिली जाणार नाही. तर कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यांनी स्वतः च्या घरीच थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रोगप्रतिकारक शक्तिसाठी पोलिसांना...

बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी त्यांना आता आयुष्यकाढा व च्यवनप्राश वाटप करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 आणि हायड्रोक्लोरिक्वीन या गोळ्याही देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना खाण्यासाठी पारले बिस्कीट तर सुरक्षिततेसाठी मास्क, पीपीई किटही दिले आहेत, असेही अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT