Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja  esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : ''विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्यानं आमचं जीवन सार्थक झालं''; नाशिकच्या अहिरे दाम्पत्याला आलं गहिवरून

आषाढी एकदशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा पार पडली.

सकाळ डिजिटल टीम

''आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आम्ही या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.''

Ashadhi Ekadashi Pandharpur Mahapuja : आषाढी एकदशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा पार पडली. यंदा शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला मिळाला.

विठ्ठलाच्या पूजेसाठी मानाचे वारकरी यंदा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दाम्पत्य ठरले. सटाणा तालुक्यातील अंबासन गावातील बाळू शंकर अहिरे (वय 55) आणि सौ. आशाबाई बाळू अहिरे (वय 50) यांना संधी मिळाली. अहिरे दाम्पत्य गेल्या 16 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहे.

अहिरे दाम्पत्याला गहिवरून आलं

आज पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर अहिरे दाम्पत्याला गहिवरून आलं होतं. दरम्यान, शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर अहिरे दाम्पत्यासोबत संवाद साधला. "आम्ही दरवर्षी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गाडीवर येतो. दर्शन घेतल्यानंतर निघून जातो. यंदाही देवाचं दर्शन घ्यायचं आणि घरी निघून जायचं, असं आम्ही ठरवलं होतं.

''आमचं जीवन सार्थक झालं"

पण, आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आम्ही या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. गेल्या १६ वर्षांपासून आम्ही पंढरपूरची वारी करीत आहोत. विठुरायाच्या महापूजेचा मान मिळाल्याने आमचं जीवन सार्थक झालं", अशी प्रतिक्रिया बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांनी साम वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार

शेतकरी बाळू शंकर अहिरे वय 55 वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे वय 50 वर्षे मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT