Sathe family 
सोलापूर

भावना अन्‌ प्रथेला छेद देत माजी आमदार साठेंनी दिला वैज्ञानिक दृष्टिकोन ! वृक्षारोपणाने केले पत्नीच्या अस्थिंचे विसर्जन

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : निधनानंतरच्या पारंपरिक विधी व प्रथेला फाटा देत माजी आमदार ऍड. धनाजी साठे यांच्या पत्नी मंदाकिनी साठे यांच्या अस्थि व रक्षा नदीत विसर्जित न करता नातवांच्या हातून तिसऱ्या दिवसाच्या विधी दिवशी अकरा झाडे लावून त्यात अस्थि व रक्षा विसर्जित करण्यात आली. अस्थि व रक्षा नदीत विसर्जित केल्याने नदीचे प्रदूषण होत असल्याने राजकारणातील मोठे प्रस्थ असणाऱ्या साठे कुटुंबाने घालून दिलेला आदर्श सर्वांनाच अनुकरणीय आहे. शिवाय मंदाकिनी साठे यांच्या निधनानंतरचे सर्व विधी सातव्या दिवशीच पूर्ण करण्यात येणार आहेत. 

आपणाकडे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या विधींबाबत लोक आग्रही असताना दिसून येतात. मात्र यातील काही विधींमुळे नदी प्रदूषणासारखी समस्या उद्‌भवते. शिवाय विधी तेराव्या दिवसापर्यंत केले जातात. माजी आमदार ऍड. धनाजी साठे यांच्या पत्नी व कॉंग्रेसचे नेते दादासाहेब साठे यांच्या मातु:श्री तसेच माढ्याच्या नगराध्यक्षा ऍड. मीनल साठे यांच्या सासू, माजी जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी साठे यांचे मंगळवारी (ता. 16) निधन झाले. प्रथेप्रमाणे गुरुवारी (ता. 18) तिसऱ्या दिवशीचे विधी माढ्यातील साठे मळ्यात करण्यात आले. 

या वेळी पारंपरिक रुढीप्रमाणे अस्थि व रक्षा नदीत विसर्जित करण्यात आल्या नाहीत. तर मंदाकिनी साठे यांची नात कनिष्का साठे, नातू वेदांत साठे, हर्षवर्धन साठे, अजय चव्हाण यांनी आपल्या आजीच्या स्मरणार्थ अकरा झाडे लावून झाडांच्या आळयात अस्थि व रक्षा विसर्जित करून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. याशिवाय दहाव्या दिवसाचे विधी पाचव्या दिवशी व तेराव्याचे विधी सातव्या दिवशी करण्यात येणार आहेत. हे विधी नदीकाठी न करता दहन करण्यात आलेल्या ठिकाणीच करण्यात येणार आहेत. 

या पद्धतीने तिसऱ्या दिवसाचे विधी करण्याचे काही प्रयोग अलीकडच्या काळात झाले आहेत. क्रीडा, चित्रपट व राजकारणातील लोकांचे सामान्य लोक अनुकरण करत असतात. राजकीय क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या साठे घराण्यातील व्यक्तीच्या निधनानंतर पर्यावरणपूरक विधी करण्याबरोबरच विधींचा कालावधीही कमी करण्याचा हा प्रयोग अनुकरणीय असून, वाढत्या नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व वृक्षारोपण चळवळ बळकट करण्यासाठी गरजेचाही आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT