ncp Shivsena 
सोलापूर

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना नाराज; "या' जिल्ह्यातील नेत्यांची पक्षप्रमुखांकडे धाव! 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले, त्या वेळी राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, दिलीप कोल्हे, महेश गादेकर या नेत्यांना शरद पवार यांच्याशी भेटायला वेळ दिली नसल्याने राष्ट्रवादी पक्षात नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले होते. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी तशी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सोमेश्‍वर क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील एकामागोमाग एक असे नाराजीनाट्य सुरू आहे. 

शिवसेनेचे पदाधिकारी सोमेश क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त करताना म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आम्हाला विश्वासात घेत नसून आम्हाला सापत्न वागणूक देत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कायम दुय्यम वागणूक देत असून विकासकामांना प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे हे सरकार महाविकास आघाडीचे आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे, असा प्रश्न आम्हाला पडत आहे. 

सोलापूरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख वाघमोडे यांनीही याबाबत आपली तक्रार शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिवसेनेने देखील याची दखल घेत शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांची मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे पालक म्हणून नेमणूक केली आहे. 

पालकमंत्री म्हणतात... 
नेत्यांच्या नाराजीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात, महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे. सुनील प्रभूंची निवड होणे म्हणजे आघाडीत खदखद आहे असे नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे आमदार सुनील प्रभू यांच्याकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संघटनात्मक पालकत्व देण्यात काहीच गैर नाही. कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना भेटता येत नाही त्यामुळे त्यांना वेळ देता आला नसेल. त्यामुळे त्यांचा गैरसमजही झाला असेल मात्र आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहोत. भविष्यात सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT