3sushil_praniti_f_20_282_29_20_20Copy (1).jpg 
सोलापूर

मुलीच्या निवडीनंतर सुशिलकुमार शिंदे म्हणाले ! कॉंग्रेसला बळ मिळेल, कार्याध्यक्ष म्हणून प्रणिती चांगलेच काम करेल 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात भाजपला सत्तेपासून रोखल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये आमदारकीची हॅट्रिक केलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि दुसरीकडे त्या कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या, त्यामुळे त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना खात्री होती. मात्र, त्यांना डावलण्यात आले. तरीही त्यांनी पक्षाबद्दल नाराजी व्यक्‍त न करता नेहमीप्रमाणे काम सुरु ठेवले. त्या पक्षनिष्ठेचे फळ पक्षाने कार्याध्यक्षपदी निवड करुन दिल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केल्या आहेत. प्रणिती चांगले काम करेल, असा विश्‍वास त्यांचे पिता तथा केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्‍त केला आहे.

सोलापूरसाठी चांगली संधी 
कॉंग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. सर्वच पदाधिकारी पक्षवाढीसाठी आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी चांगले काम करतील, याची खात्री कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्‍त केली आहे. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूरसाठी चांगली संधी मिळाली आहे. प्रणिती पक्षासाठी चांगले काम करेल, असा विश्‍वास आहे. मुलीच्या निवडीनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया 'सकाळ'शी बोलताना दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस अन्य पक्षांच्या तुलनेत पिछाडीवर असून सध्या आमदार म्हणून प्रणिती शिंदे या पक्षाच्या एकमेव आहेत. आता पक्षवाढीसाठी आणि पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा मोठा फायदा होईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडेल, अशीही शक्‍यता आहे. त्यांची निवड होताच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा द्यायला सुरवात केली आहे. 

कॉंग्रेसचे नुतन पदाधिकारी 
कॉंग्रेसने आज प्रदेशाध्यक्ष व कार्याध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. त्यात विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सहाजणांची निवड करण्यात आली आहे. शिवाजीराव मोगे, बसवराज पाटील, मोहम्मद अरिफ नसिम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांदोरे यांचाही त्यात समावेश आहे. तर उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलाश गोंरट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम. एम. शेख आणि माणिक जगताप यांची निवड झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT