Waghay Murali 
सोलापूर

माळशिरस तहसीलसमोर वाघ्या-मुरळींचे आंदोलन; मार्चपासून सुरू आहे कलावंतांची उपासमार 

गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : वाघ्या-मुरळी लोककलावंतांनी विविध मागण्यासाठी माळशिरस येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रा. मार्तंड साठे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

वाघ्या-मुरळी कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून धर्मजागरण, कुलधर्म - कुलाचार पालन याद्वारे समाज प्रबोधनासह समाजसेवेचे कार्य करीत आहेत. समाजातील भाविक - भक्तांच्या आश्रयावर वाघ्या-मुरळी यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत असतो. अतिवृष्टी, निवडणूक आचारसंहिता यामुळे या कलावंतांना जगण्यापुरतेही उत्पन्न मिळू शकले नाही. मार्चपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटात सापडून हे कलावंत उपासमारीला तोंड देत आहेत. या कलावंतांनी जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी शासन दरबारी काही मागण्यांसाठी हे आंदोलन केले. हे आंदोलन अहिल्यादेवी होळकर चौकापासून करण्यात आले. 

कलावंतांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : वाघ्या - मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मिळावा. या कलावंतांच्या मुला- मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा. या लोककलेची शासन दरबारी नोंद व्हवी. कलावंतांच्या निवासासाठी जमीन, घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करावी. या कलावंतांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी. स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. नियमांचे पालन करून लोक कलाकारांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी. देवालये, मंदिरे, राउळे खुली करावीत. यासाठी लोककलावंत तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर येत्या रविवारपासून आंदोलन करण्यास सुरवात करणार आहेत, अशी प्रा. मार्तंड साठे यांनी घोषणा केली. 

माळशिरस तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एन. डी. काळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी प्रा. मार्तंड साठे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, संजय हिवरे, सचिन जाधव, रामभाऊ भोसले, प्रदीप राऊत, वनिता वाघमोडे, सोमनाथ जिनपुरीकर, सागर शिंदे, सुभाष गोरे, मंगला जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Monsoon : जळगावात यंदा १०७ टक्के पाऊस; माॅन्सून माघारी, अतिवृष्टी न झाल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा

Diwali Faral Tips: दिवाळी फराळ टेस्टी आणि कुरकुरीत करायचा आहे का? मग 'या' 5 टिप्स नक्की वापर!

Jalgaon Crime : एल.के. फार्म हाउस सायबर फसवणूक: हॅण्डलर आणि मास्टरमाईंडविरोधात 'लूक आउट' नोटीस जारी

वडील गेले, लग्न नाही, मुलं नाहीत... हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं कोण असेल त्यांची म्हातारपणाची काठी?

Cough syrup issue: कफ सीरप प्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री नागपुरात! राहुल गांधींसह तमिळनाडू सरकारवर निशाणा

SCROLL FOR NEXT