ajit pawar dcm ncp ajit pawar join BJP-Shiv Sena govt maharashtra politics Mangalvedha celebration solapur sakal
सोलापूर

NCP Ajit Pawar : भाजप-शिवसेना यांच्या सत्तेत राष्ट्रवादी काॅग्रेसची भागीदारी, मंगळवेढ्यात जल्लोष

विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य मंत्र्याने थेट राजभवनात जाऊन शपथ ग्रहण केली

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : भाजप आणि शिवसेना यांच्या सत्तेत राष्ट्रवादी काॅग्रेस ने भागीदारीत घेत राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री सह अन्य 9 जनांनी मंत्रिपदाची शप घेतल्याबद्दल मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाके उडवत जल्लोष करण्यात आला.

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षात बसण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळून देखील नव्याने झालेल्या महाविकास आघाडीच्या रूपाने सत्ता स्थापन करत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली.

अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निधी वाटपात केलेल्या अन्यायाबरोबर अन्य काही मुद्द्यावरून शिवसेनेत फूट होऊन 40 आमदारांनी भाजपाचे समर्थन घेत मुख्यमंत्री पदासह सत्ता ताब्यात घेतले परंतु या घटनेला एक वर्ष झाल्यानंतर शिवसेनेतील 16 आमदारांना पात्र की अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अधिकारात येऊन थांबला असतानाच आज अचानक नाट्यमय घडामोडी घेत विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य मंत्र्याने थेट राजभवनात जाऊन शपथ ग्रहण केली

अचानक झालेल्या कार्यक्रमात वर्षभरात सत्तेवरून दूर झालेल्या राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी झाल्यामुळे मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाके उडवून जल्लोष केला.विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला,

तर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बी आर एस मध्ये प्रवेश केल्यामुळे मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असतानाच आज झालेल्या शपथविधी मुळे राष्ट्रवादीमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले.

यावेळी रामेश्वर मासाळ,अरूण किल्लेदार,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,  शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार, दादा डोंगरे, बंडु मासाळ, रविराज मोहिते, जमीर इनामदार, ठेंगील वैभव, अय्याज शेख,रोहन डांगे ,सुग्रीव शिवशरण ,सुरेश साबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT