अक्‍कलकोट, "दक्षिण' कोरोनामुक्‍तीकडे ! पंढरपुरात परिस्थिती बिकटच
अक्‍कलकोट, "दक्षिण' कोरोनामुक्‍तीकडे ! पंढरपुरात परिस्थिती बिकटच  Canva
सोलापूर

अक्‍कलकोट, 'दक्षिण' कोरोनामुक्‍तीकडे ! पंढरपुरात परिस्थिती बिकटच

तात्या लांडगे

शहरात रविवारी आठ तर ग्रामीणमध्ये 437 रुग्ण वाढले असून, ग्रामीणमधील आठ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सोलापूर : शहरात (solapur City) रविवारी आठ तर ग्रामीणमध्ये 437 कोरोना (Covid-19) रुग्ण वाढले असून, ग्रामीणमधील आठ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. पंढरपूर (Pandharpur) तालुक्‍यात सर्वाधिक 135 रुग्ण आढळले असून तालुक्‍यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. दिलासादायक बाब म्हणजे, अक्‍कलकोट (Akkalkot) व दक्षिण सोलापूर (South Solapur) हे दोन्ही तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. अक्‍कलकोट तालुक्‍यात चार तर दक्षिण सोलापुरात 16 ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत एक लाख 93 हजार 95 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामीणमध्ये रविवारी अक्‍कलकोटमध्ये दोन, बार्शीत 38, करमाळ्यात 48, माढ्यात 53, माळशिरस तालुक्‍यात 72, मंगळवेढ्यात नऊ, मोहोळ तालुक्‍यात 35, उत्तर सोलापुरात पाच, पंढरपूर तालुक्‍यात 135, सांगोल्यात 40 रुग्ण आढळले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्‍यात रविवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. शहरातील प्रभाग क्र. 10, 15, 18, 19, 22, 24 आणि 26 या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, म्युकरमायकोसिसचा एक रुग्ण आढळला असून आता या आजाराची रुग्णसंख्या 658 झाली आहे. आतापर्यंत या आजारातून 541 रुग्ण बरे झाले असून 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण उपचार घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे मोहोळ तालुक्‍यातील रुग्णसंख्या वाढू लागली आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे गर्दीच्या ठिकाणी जात आहेत. परंतु, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे. तसेच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असेही सांगितले जात आहे.

कोरोनाची स्थिती...

  • कोरोनाच्या एकूण टेस्ट : 26,37,447

  • एकूण पॉझिटिव्ह : 1,93,095

  • कोरोनाचे एकूण मृत्यू : 4,809

  • बरे झालेले रुग्ण : 1,84,563

लसीकरणाची स्थिती...

  • आतापर्यंत ग्रामीणमधील सहा लाख 44 हजार 869 व्यक्‍तींनी टोचली कोरोनावरील प्रतिबंधित लस

  • ग्रामीणमधील दोन लाख 50 हजार 179 व्यक्‍तींना मिळाला लसीचा दुसरा डोस

  • शहरातील दोन लाख 93 हजार 114 व्यक्‍तींना पहिला तर एक लाख 15 हजार 538 जणांनी घेतला दुसरा डोस

  • आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील एकूण आठ लाख 95 हजार 48 व्यक्‍तींचे लसीकरण; त्यापैकी चार लाख आठ हजार 652 जणांना मिळाला दुसरा डोस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT